शेकापमध्येही गोकुळ उमेदवारीसाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:24 IST2021-03-26T04:24:18+5:302021-03-26T04:24:18+5:30

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या उमेदवारीसाठी सत्ताधारी आणि विरोधी आघाडीत इच्छुकांचे पीक आले. याला शेतकरी कामगार पक्षदेखील अपवाद नाही. ...

Gokul's candidature in Shekap too | शेकापमध्येही गोकुळ उमेदवारीसाठी रस्सीखेच

शेकापमध्येही गोकुळ उमेदवारीसाठी रस्सीखेच

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या उमेदवारीसाठी सत्ताधारी आणि विरोधी आघाडीत इच्छुकांचे पीक आले. याला शेतकरी कामगार पक्षदेखील अपवाद नाही. येथे उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू असून इच्छुकांनी आज, शुक्रवारी अर्ज नेण्याची व भरण्याचीही तयारी केली आहे.

शेतकरी कामगार पक्षाने विरोधी शाहू आघाडीशी घरोबा केला आहे. त्यांना एक जागा देण्याचे प्राथमिक बैठकीत ठरले आहे. अजून अंतिम बैठक झालेली नाही. आज, शुक्रवारी किंवा उद्या, शनिवारी यासंदर्भात शेकापची एकत्रित बैठक होणार आहे. ताेपर्यंत जे कोणी इच्छुक आहेत, त्यांनी अर्ज आणून भरावेत, आमची काही हरकत नाही, असे शेकापचे जिल्ह्याचे नेते व माजी आमदार संपतराव पवार यांनी सांगितले. शाहू आघाडीत सामील होण्याबाबत यापूर्वी आघाडीच्या नेत्यांसमवेत प्राथमिक चर्चा झाल्या आहेत. अजून पुढील बैठकीचा काही निरोप आलेला नाही. आल्यानंतर आम्ही आमच्या बाजूने प्रस्ताव देऊ, पण आम्हीच अजून उमेदवार निश्चित केलेला नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

शेेकापमधून एका जागेसाठी बाबासाहेब देवकर व केरबा पाटील हे दोघे मातब्बर इच्छुक आहेत. दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. देवकर हे ‘गोकुळ’मधील भ्रष्टाचार व अपप्रवृत्तीवर सातत्याने आवाज उठवत आहेत. गोकुळ बचाव समितीच्या माध्यमातून गेली पाच वर्षे तर त्यांनी रान उठवले आहे. आपल्याच संधी मिळावी यासाठी त्यांचा आग्रह आहे.

Web Title: Gokul's candidature in Shekap too