शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गोकुळ,वारणाची १९२२ टन पावडर पडून, बटरही शिल्लक राहिल्याने संघापुढे अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 17:42 IST

कोरोनामुळे दुधाच्या विक्रीवर परिणाम झाल्याने गेल्या पाच महिन्यांपासून दुधाच्या पावडरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करावे लागत आहे. त्यामुळे गोकुळ व वारणा दूध संघांकडे १९२२ टन पावडर व ३३८४ टन बटर पडून असल्याने दूध संघांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत चार महिन्यांनंतर पावडरीच्या दरात किलोमागे २५ रुपयांची वाढ झाली असली तरी, त्या पटीत मागणी नसल्याने पावडरीचा उठाव होत नाही.

ठळक मुद्देगोकुळ,वारणाची १९२२ टन पावडर पडून, बटरही शिल्लक राहिल्याने संघापुढे अडचणीचार महिन्यांनंतर दरात प्रतिकिलो २५ रुपयांची वाढ

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोरोनामुळे दुधाच्या विक्रीवर परिणाम झाल्याने गेल्या पाच महिन्यांपासून दुधाच्या पावडरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करावे लागत आहे. त्यामुळे गोकुळ व वारणा दूध संघांकडे १९२२ टन पावडर व ३३८४ टन बटर पडून असल्याने दूध संघांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत चार महिन्यांनंतर पावडरीच्या दरात किलोमागे २५ रुपयांची वाढ झाली असली तरी, त्या पटीत मागणी नसल्याने पावडरीचा उठाव होत नाही.कोरोनाच्या संकटामुळे सगळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हॉटेल बंद, मिठाईचे उत्पादन ऐन सणासुदीत पूर्ण क्षमतेने नसल्याने दुधाची मागणी घटली. त्यामुळे अतिरिक्त दुधाची पावडर तयार करावी लागली. गोकुळने गाय व म्हशीच्या दुधापासून २१०८ टन पावडर तयार केली. त्यातील म्हशीची ३००, तर गायीची ८०० अशा ११०० टन पावडरीची विक्री झाली असून, अजून एक हजार टन पावडर, तर २५२० टन बटर शिल्लक आहे. वारणा दूध संघाकडे ९२२ टन पावडर, ८६४ टन बटर, तर ४१ टन तूप शिल्लक आहे.लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पावडर व बटरच्या मागणी व दरांत घसरण झाली. पावडरीचा दर १५० रुपये किलोपर्यंत खाली आला होता. चार महिन्यांनंतर देशांतर्गत बाजारपेठेमध्ये दरात थोडी सुधारणा झाली असून, आता १७५ रुपये दर मिळत आहे. मात्र त्या पटीत मागणी नसल्याने राज्यातील दूध संघांकडे सुमारे २५ हजार टन पावडर पडून आहे.महानंदाचे ४५० टन पावडर निर्मितीराज्यातील अतिरिक्त दुधापासून पावडर तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. महानंदाच्या माध्यमातून हे दूध खरेदी करून त्याची पावडर तयार केली. आतापर्यंत ४७ लाख लिटर दुधापासून ४५० टन पावडर व २२० टन बटर तयार झाले आहे.गोकुळचे शासनाकडे ५.७५ कोटी अडकलेगेल्या वर्षी पावडरीच्या निर्यातीसाठी राज्य शासनाने प्रतिकिलो ५० रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले होते. गोकुळने ८५० टन पावडर निर्यात केली. मात्र त्याचे सव्वाचार कोटी निर्यात अनुदान अजून लटकले आहे. त्याचबरोबर महानंदाला पावडर तयार करून दिल्याचे दीड कोटी अडकले आहेत.जिल्ह्यातील दूध पावडर, बटर, तुपाचा शिल्लक साठा टनांमध्ये -        दूध संघ       पावडर      बटर         तूप

  • गोकुळ          १०००            २५२०      १३
  • वारणा            ९२२             ८६४        ४१
  • एकूण           १९२२          ३३८४      ५४

 

अतिरिक्त दुधापासून पावडर तयार केल्याने नुकसान होते. गोकुळने हळूहळू पावडर व बटरची विक्री सुरू केली असली तरी अद्याप हजार टन पावडर शिल्लक आहे.- रवींद्र आपटे, अध्यक्ष, गोकुळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर