प्रकाश पाटील-- कोपार्डे --वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर ‘गोकुळ’च्या दुधाला उकळी फुटली आहे. यातून वासाच्या दुधापासून दुधाला मिळणारा फायदा व संस्था व दूध उत्पादकांना बसणारा आर्थिक फटका ऐरणीवर आला आहे. केवळ एका महिन्यात ३0 हजार लिटर दूध वासाचे निघत असून, याला केवळ दोन रुपये प्रतिलिटर दर मिळतो. मात्र, या दुधापासून गोकुळ उपपदार्थ तयार करून त्यातून बक्कळ नफा मिळविते.दुधाला वास येतो या नावाखाली दर दिवशी एक हजार लिटर बाजूला काढले जाते, असे ‘गोकुळ’च्या प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दररोज गाय व म्हैस मिळून बारा लाख लिटर दूध संकलनाचा आकडा ‘गोकुळ’ने गाठला आहे. याचा दर्जा टिकविणे महत्त्वाचे असले तरी त्याबाबत दूध उत्पादकांत प्रबोधन करणे गरजेचे आहे. यावासाच्या दुधाचा अप्रत्यक्ष दूध उत्पादकांना, तर प्रत्यक्ष दूध संस्थांना आर्थिक फटका बसत असल्याने दुधाला किमान दर द्यावा, अशी मागणी संस्था चालकांतून होत आहे. मात्र, याबाबत पुढे येऊन बोलायला कोणी तयार नसल्याने गेली कित्येक वर्षे हा असंतोष खदखदत आहे.या दुधासाठी संस्था चालकांना प्रतिलिटर दोन रुपये दर दिला जातो. या दुधाचा व्यवस्थापन खर्च संस्थांना मिळत असला तरी संस्थेत संकलन होताना हे दूध शुद्ध असल्याने यावेळी फॅटप्रमाणे दूध उत्पादकांना दर देण्याची जबाबदारी संस्थेवर पडते. हा तोटा संस्थेच्या नफ्यातून घालणार असल्याने याचा अप्रत्यक्षपणे तोटा दूध उत्पादकांचाच असतो.सध्या जनावरांच्या वाढलेल्या किमती, पशुखाद्य औषोधोपचार, वैरण व मजुरी यांचा वाढलेला खर्च पाहता दूध उत्पादक मेटाकुटीला आला आहे. ‘गोकुळ’च्या माध्यमातून दर दहा दिवसाला मिळणारे बिल शेतकरी दूध उत्पादकाला मिळणारा आर्थिक आधार म्हणून पाहिले जाते. हीच प्रतिमा कायम राहणे सध्याच्या स्पर्धेच्या काळात ‘गोकुळ’च्या हिताचे आहे, अशा प्रतिक्रिया या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहेत.४ रुपयांच्या दुधातून १00 रुपयांचे पनीरजे दूध वासाचे व खराब म्हणून काढले जाते. त्यापासून पनीर बनविले जाते. एक किलो पनीर उत्पादनासाठी दोन लिटर दूध लागत असले, तरी हे दूध केवळ ४ रुपयांना खरेदी केले जाते आणि या पनीरला १00 रुपये किलो दर मिळतो, म्हणजे ४ रु पयांच्या दुधापासून १00 रुपये उत्पन्न मात्र हे दोन लिटर दूध उत्पादनासाठी दूध उत्पादकांना किमान ६0 रुपये खर्च येतो
‘गोकुळ’ला वासाच्या दुधाचा रतीब
By admin | Updated: September 3, 2016 01:06 IST