‘गोकुळ’ने म्हैस दूध फॅटचा प्रतिपॉईंट दर ४० पैसे करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:25 IST2021-01-03T04:25:26+5:302021-01-03T04:25:26+5:30

खोची : गोकुळ दूध संघाने म्हैस दूध दराच्या फॅटमध्ये प्रतिपॉईंट दहा पैशाची वाढ करून तो चाळीस पैसे प्रतिपॉईंट करावा. ...

Gokul should increase the price of buffalo milk fat by 40 paise per point | ‘गोकुळ’ने म्हैस दूध फॅटचा प्रतिपॉईंट दर ४० पैसे करावा

‘गोकुळ’ने म्हैस दूध फॅटचा प्रतिपॉईंट दर ४० पैसे करावा

खोची : गोकुळ दूध संघाने म्हैस दूध दराच्या फॅटमध्ये प्रतिपॉईंट दहा पैशाची वाढ करून तो चाळीस पैसे प्रतिपॉईंट करावा. यामुळे म्हैस दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळून त्यांना न्याय मिळेल, अशी मागणी लाटवडे (ता. हातकणंगले) येथील हनुमान सहकारी दूध संस्थेचे अध्यक्ष ॲड. शहाजी पाटील यांनी केली. सतत विविध उपक्रम राबवून गोकुळ दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रतिपॉईंट चाळीस पैसे वाढ केली, तर म्हैस दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल. याचा विचार तत्काळ करावा.

सुरुवातीच्या काळात म्हैस व गाय दुधाच्या फॅटमधील प्रतिपॉईंट दरामध्ये दहा पैशाचा फरक असायचा, त्यामुळे म्हैस दुधाचा पुरवठा संघाला जास्त होत होता. मधल्या काळात म्हैस व गाय दुधाचा दर प्रतिपॉईंट तीस पैसे निश्चित करण्यात आला. त्यामुळे म्हैस दुधाचे संकलन कमी व गाय दुधाचे संकलन वाढले.

वास्तविक म्हैस दुधासाठी करावे लागणारे संगोपन, दैनंदिन पशुखाद्य व आहार खर्च, कष्ट तसेच भाकड काळ याचा विचार करता म्हैस दूध दराचा फॅटमधील प्रतिपॉईंट दर दहा पैशांनी वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. दूध संघाच्या संचालक मंडळाने उत्पादकांना न्याय देण्यासाठी दरात वाढ करावी, अशी मागणी शहाजी पाटील यांनी केली आहे.

Web Title: Gokul should increase the price of buffalo milk fat by 40 paise per point