गोकुळने म्हैस दुध फॅट दरात वाढ करावी : शहाजी पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:17 IST2021-01-08T05:17:45+5:302021-01-08T05:17:45+5:30
खोची : गोकुळ दूध संघाने म्हैस दूध फॅट दरामध्ये प्रतिपॉईंट दहा पैशांची वाढ करून तो चाळीस पैसे प्रतिपॉईंट करावा. ...

गोकुळने म्हैस दुध फॅट दरात वाढ करावी : शहाजी पाटील
खोची : गोकुळ दूध संघाने म्हैस दूध फॅट दरामध्ये प्रतिपॉईंट दहा पैशांची वाढ करून तो चाळीस पैसे प्रतिपॉईंट करावा. यामुळे म्हैस दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, अशी मागणी लाटवडे (ता. हातकणंगले) येथील हनुमान सहकारी दूध संस्थेचे अध्यक्ष अॅड.शहाजी पाटील यांनी केली आहे.
गोकुळ दूध संघाचा राज्यात प्रथम, देशात तिसरा व जगात चौदावा क्रमांक आहे. सतत विविध उपक्रम राबवून दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. दूध फॅट दरामध्ये प्रतिपॉईंट दहा पैशांची वाढ केली तर म्हैस दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास चांगली मदत होईल. याचा विचार तातडीने करावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
सुरुवातीच्या काळात म्हैस व गाय दुधाच्या फॅटमधील प्रतिपॉईंट दरामध्ये दहा पैशांचा फरक असायचा. त्यामुळे म्हैस दुधाचा पुरवठा संघाला जास्त होत होता. मधल्या काळात म्हैस व गाय दुधाचा दर प्रतिपॉईंट तीस पैसे निश्चित करण्यात आल्यामुळे म्हैस दुधाचे संकलन कमी व गाय दुधाचे संकलन वाढले.
वास्तविक म्हैस दुधासाठी करावे लागणारे संगोपन, दैनंदिन पशुखाद्य व आहार खर्च, कष्ट तसेच भाकड काळ याचा विचार करता, म्हैस दूध फॅट दरामध्ये प्रतिपॉईंट दहा पैशांनी वाढ करणे गरजेचे आहे.