गोकुळ शिरगाव पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:27 IST2021-05-25T04:27:13+5:302021-05-25T04:27:13+5:30

पुणे-बेंगलोर महामार्गावर कणेरीवाडी हद्दीत असलेल्या रेणुका लोकनाट्य कला केंद्रावर पोलिसांनी संचारबंदी असतानासुद्धा निष्काळजीपणे सर्व नियमांचे शासकीय आदेशाचे पालन न ...

Gokul Shirgaon police action | गोकुळ शिरगाव पोलिसांची कारवाई

गोकुळ शिरगाव पोलिसांची कारवाई

पुणे-बेंगलोर महामार्गावर कणेरीवाडी हद्दीत असलेल्या रेणुका लोकनाट्य कला केंद्रावर पोलिसांनी संचारबंदी असतानासुद्धा निष्काळजीपणे सर्व नियमांचे शासकीय आदेशाचे पालन न करता लोकनाट्य चालू ठेवल्याबद्दल ३४ जणांवर कारवाई करून दहा लाख ६७ हजार रुपयांचा माल जप्त केला.

सोमवारी (दि.२४) मध्यरात्री “रेणुका लोकनाट्य कला केंद्र” या ठिकाणी गर्दी जमवून बाहेरून कुलूप घालून आत चालू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गर्दी न जमण्याचे आदेश दिले असतानासुद्धा कणेरीवाडी येथील रेणुका लोकनाट्य कला केंद्र या ठिकाणी बाहेरून कुलूप लावून आत लोक एकत्र आल्याचे निदर्शनास आल्यानंतर संचारबंदी असतानासुद्धा एवढी गर्दी जमा केल्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये क्यू.आर.टी पथक, कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नाळे, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणाली पवार आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन यामध्ये ३४ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल नथुराम गायकवाड यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

Web Title: Gokul Shirgaon police action