‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांची ‘लोकमत’ला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:23 IST2021-05-16T04:23:00+5:302021-05-16T04:23:00+5:30

कोल्हापूर : ‘गोकुळ’चे नूतन अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शनिवारी ‘लोकमत’ शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’चे संस्थापक ...

Gokul president Vishwas Patil's visit to Lokmat | ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांची ‘लोकमत’ला भेट

‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांची ‘लोकमत’ला भेट

कोल्हापूर : ‘गोकुळ’चे नूतन अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शनिवारी ‘लोकमत’ शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

‘लोकमत’च्या वतीने वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष पाटील म्हणाले, ‘गोकुळ’च्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी आम्हांला काम करण्याची संधी दिली. निवडणुकीदरम्यान आघाडीच्या वतीने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणार आहे. सध्या लाॅकडाऊनचा कालावधी असल्याने दुधाचा उठाव थोडा कमी झाला आहे. तरीही दूध उत्पादकांना कोणत्याही परिस्थितीत दोन रुपये जादा दर दिला जाईल. यावेळी ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, एस. आर. पाटील, प्रकाश पाटील उपस्थित होते.

फोटो ओळी : ‘गोकुळ’चे नूतन अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शनिवारी ‘लोकमत’ कोल्हापूरच्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. (फोटो-१५०५२०२१-कोल-गोकुळ) (छाया- राज मकानदार)

Web Title: Gokul president Vishwas Patil's visit to Lokmat