गोकुळ दूध महाराष्ट्राचा ब्रँड व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST2021-08-20T04:29:03+5:302021-08-20T04:29:03+5:30

माणगाव : प्रत्येक राज्यात दुधाचा ब्रँड आहे तसा गोकुळ दूध संघ महाराष्ट्राचा ब्रँड व्हावा, असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील ...

Gokul milk should be the brand of Maharashtra | गोकुळ दूध महाराष्ट्राचा ब्रँड व्हावा

गोकुळ दूध महाराष्ट्राचा ब्रँड व्हावा

माणगाव :

प्रत्येक राज्यात दुधाचा ब्रँड आहे तसा गोकुळ दूध संघ महाराष्ट्राचा ब्रँड व्हावा, असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केले.

तावरेवाडी (ता. चंदगड) येथील दूध शीतकरण केंद्रात झालेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) जिल्ह्यातील म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत केडीसीसी बँक अधिकारी व गोकुळ दूध संघ अधिकारी यांच्या कार्यशाळेत बोलत होते.

पाटील म्हणाले, सध्या गोकुळ संघात दीड लाख लिटरहून अधिक दूध महानंद, मुंबई येथे पॅकिंग होत आहे. ते काबीज करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. सध्या महाराष्ट्रात प्रगतीपथावर असलेल्या व शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला संघ म्हणजे 'गोकुळ' दूध आहे. शेतकऱ्यांसाठी गोकुळ दूध संघ राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

यावेळी केडीसीसीचे नाईक, बँक निरीक्षक जयवंत कुंभार, बाबूराव खवणेवाडकर, एन. के. पाटील, गोकुळ दूध संघाचे अधिकारी बी. आर. पाटील, बापू देसाई, अनिल शिखरे व सुपरवायझर व बँक निरीक्षक उपस्थित होते. कुंभार यांनी स्वागत केले. अनिल शिखरे यांनी आभार मानले.

फोटो ओळी : तावरेवाडी (ता. चंदगड) येथील दूध शीतकरण केंद्रात आम. राजेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.

क्रमांक : १९०८२०२१-गड-०१

Web Title: Gokul milk should be the brand of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.