शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

By संतोष कनमुसे | Updated: May 30, 2025 21:05 IST

Gokul Milk Kolhapur : गोकुळ दूध संघावर नाविक मुश्रीफ यांची चेअरमनपदी निवड झाली.

Gokul Milk Kolhapur ( Marathi News ) : मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्याच्या वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे पेच निर्माण झाला होता. दरम्यान, आता गोकुळच्या अध्यक्षपदाचा पेच सुटला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळ संचालक नाविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावर आता आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यपातळीवरील हस्तक्षेप झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार सतेज पाटील म्हणाले, आम्ही राजर्षी शाहू आघाडी म्हणून ही निवडणूक लढवली होती. काल आम्ही सगळे नेते मंडळी एकत्र बसलो होतो, कालच नाव निश्चित करुन तो कागद माझ्याकडे दिला होता. आम्ही सगळ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये कोणताही पक्षीय रंग नाही, जे सध्या बातम्यांमध्ये सुरू आहे तसं काहीही नाही. नाविद मुश्रीफ हेही राजर्षि शाहू आघाडीतून निवडून आले आहेत, आम्ही सगळ्यांनी एक वर्षासाठी चेअरमनपदाची धुरा त्यांच्या हातात दिली आहे, असंही सतेज पाटील म्हणाले. 

Gokul Milk : 'गोकुळ'मधील पेच सुटला; अध्यक्षपदी हसन मुश्रीफांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांची निवड

"शशिकांत पाटील चुयेकर, बाळासाहेब पाटील, अमर पाटील यासाठी इच्छुक होते. शेवटचे वर्षे आम्हाला मिळावे हे सगळ्यांना वाटते. चर्चेत शेवटी नाविद मुश्रीफ यांचे नाव निश्चित झाले. गोकुळच्या बाबतीत राज्यपातळीवरुन कोणताही हस्तक्षेप झाला नाही. अरुण डोंगळे यांनी राजकीय रंग दिल्यामुळे चर्चा झाली. नाहीतर त्याला तसा काही अँगल आहे असं मला वाटत नाही, असं सांगत सतेज पाटील यांनी गोकुळ मधील राज्यपातळीवरील हस्तक्षेपाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. 

सतेज पाटील म्हणाले, काल झालेल्या बैठकीत हसन मुश्रीफ, विनय कोरे यांच्याकडून राज्यपातळीवरील नेत्यांचा उल्लेख झाला नाही. मी त्यांना विचारले आहे त्यावेळी ते तसा कोणताही विषय झाला नसल्याचे सांगितले, आता ते मी सत्य समजून पुढे जात आहे.

नाव न घेता महाडिकांवर निशाणा

"आम्ही सगळ्यांनी मिळून या संस्थेवर सत्ता मिळवली. एक अपप्रवृत्ती बाजूला ठेवायची स्वत:च्या फायद्यासाठी गोकुळ जे चालवत होते. टँकरसाठी जे चालवत होते त्यांना बाजूला करण्यासाठी आणि दूध उत्पादकाला चार रुपये मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलोय,असं सांगत सतेज पाटील यांनी धनंजय महाडिकांवर निशाणा साधला. गेल्या चार वर्षात आम्ही दूध उत्पादकांना ११ ते १२ रुपये जास्त देण्याचा प्रयत्न केला. अनेक नवीन प्रकल्प राबविले. याआधी एका व्यक्ती भोवती हा गोकुळ संघ होता आता गेल्या चार वर्षात आम्ही हा संघ पाच लाख शेतकऱ्यांभोवती फिरवण्याचे काम केले, असंही सतेज पाटील म्हणाले. 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस