Gokul Milk Election : गोकुळ निवडणुकीबाबत म्हणणे सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 06:45 PM2021-04-19T18:45:11+5:302021-04-19T18:46:39+5:30

Gokul Milk Election kolhpaur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीबाबत राज्य सरकारने आठ दिवसात म्हणणे सादर करावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती जोसेफ व न्यायमूर्ती ललित यांच्या समोर सुनावणीची प्रक्रिया ऑनलाईन पार पडली. पुढील सुनावणी सोमवारी (दि. २६) होणार असून तोपर्यंत संघाची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे. निवडणूक कार्यक्रमात २ मे रोजी मतदान तर ४ मे रोजी मतमोजणी आहे.

Gokul Milk Election: Submit your views on Gokul Milk Election | Gokul Milk Election : गोकुळ निवडणुकीबाबत म्हणणे सादर करा

Gokul Milk Election : गोकुळ निवडणुकीबाबत म्हणणे सादर करा

googlenewsNext
ठळक मुद्देगोकुळ निवडणुकीबाबत म्हणणे सादर करासर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश : सोमवारी होणार सुनावणी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीबाबत राज्य सरकारने आठ दिवसात म्हणणे सादर करावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती जोसेफ व न्यायमूर्ती ललित यांच्या समोर सुनावणीची प्रक्रिया ऑनलाईन पार पडली. पुढील सुनावणी सोमवारी (दि. २६) होणार असून तोपर्यंत संघाची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे. निवडणूक कार्यक्रमात २ मे रोजी मतदान तर ४ मे रोजी मतमोजणी आहे.

गोकुळची निवडणुकीची प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू झाली आहे. मात्र कोरोनाचे संकट वाढत असल्याने निवडणुकीला स्थगिती द्यावी, यासाठी सत्तारूढ गटाच्या वतीने काही संस्थांनी साधारणता महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सोमवारी सुनावणी झाली.

कोल्हापूर जिल्ह्यात रोज पाचशेपेक्षा अधिक कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. त्यात दोन दिवसापूर्वी  गोकुळच्या एका ठराव धारकाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याने सत्तारूढ गटाने हाच मुद्दा सर्वोच्च न्यायालयात लावून धरला. ऑनलाईन सुनावणीमध्ये कोरोनामुळे राज्य सरकारने ४५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकल्या, मात्र यातून गोकुळसह अन्य सोळा संस्थांना वगळण्यात आल्याचे ही निदर्शनास आणून दिले.

यावर, सोमवारपर्यंत राज्य सरकारने लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. दरम्यान, निवडणुकीबाबत सोमवारी सुनावणी होणार असल्याने गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे.

Web Title: Gokul Milk Election: Submit your views on Gokul Milk Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.