शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Kolhapur: ‘गोकुळ’ने केली संस्था व्यवस्थापन खर्च अनुदानात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 14:08 IST

म्हैस दुधालाच मिळणार प्रतिलिटर १० ते २५ पैसे : वासाच्या दूध खरेदीतही वाढ

राजाराम लोंढेकोल्हापूर : म्हैस दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी ‘गोकुळ’ दूध संघाने प्राथमिक दूध संस्थांना देण्यात येणाऱ्या व्यवस्थापन खर्च अनुदानात वाढ केली आहे. ही वाढ केवळ म्हैस दुधालाच व ज्यांचे १०० लिटरपेक्षा अधिक म्हैस दूध संकलन आहे, अशा संस्थांना प्रतिलिटर १० ते २५ पैशांपर्यंत ही वाढ मिळणार आहे.

गोकुळ’च्या म्हैस दुधाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. पण, मागणी आणि उत्पादन यात तफावत असल्याने म्हैस दूध वाढीसाठी संघाचे प्रयत्न सुरू आहेत. संघाने १७ लाख ५० हजार लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केला. यामध्ये जवळपास ९ लाख २५ हजार लिटर म्हशीचे दूध आहे. आगामी वर्षभरात प्रतिदिनी २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करायचा आहे, त्यादृष्टीने संचालक मंडळाने कंबर कसली आहे.म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील सर्वाधिक दूध खरेदी दराबरोबरच परराज्यातील म्हैस खरेदीसाठी ४० हजार रुपयांपर्यंत अनुदानात वाढ केली. उत्पादकांबरोबरच आता, दूध संस्थांना प्रोत्साहीत करण्यासाठी व्यवस्थापन खर्चात वाढ केली आहे.वासाच्या म्हैस दुधाला प्रतिलिटर ४ व गायीच्या दुधाला २ रुपये दिले जात होते. पण, यामुळे संस्था अडचणीत येतात. यासाठी त्यामध्ये वाढ करून अनुक्रमे ६ व ४ रुपये देण्यात येणार आहेत.

स्थानिक विक्रीमुळे संस्थांच्या अडचणी

‘गोकुळ’शी संलग्न दूध संस्थांकडून गवळी विक्री बंद करण्यात आली आहे. मात्र, ज्यांची जनावरे नाहीत अथवा गाभण आहेत, अशांना स्थानिक दूध विक्री करावी लागते. साधारणत: ५पासून ४० लिटरपर्यंत म्हैस दुधाची विक्री होते. ज्यांचे म्हैस दुधाचे संकलन कमी आहे, स्थानिक विक्रीमुळे १०० लिटरपेक्षा कमी दूध ‘गोकुळ’ला जाते, अशा संस्थांना फटका बसणार आहे.दुर्गम तालुक्यातील संस्थांवर अन्यायगगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड, भुदरगड यांसारख्या दुर्गम तालुक्यातील वाड्यावस्त्या आणि लहान गावात गाय व म्हैस मिळून १०० लिटर दूध संकलन होत नाही. ‘गोकुळ’शी संलग्न ५,८०० संस्थांपैकी अशा संस्थांची संख्या २ हजारपेक्षा अधिक आहे. संघाच्या या धोरणाचा त्यांच्यावर अन्याय होणार आहे.

असे मिळणार वाढीव अनुदान -

संकलन, प्रतिदिन    सध्याचे अनुदान    एकूण मिळणारे अनुदान१०० ते २०० लिटर       ६० पैसे                   ७० पैसे२०१ ते ३०० लिटर       ६० पैसे                   ७५ पैसे३०१ ते ५०० लिटर       ६० पैसे                   ८० पैसे५०१पेक्षा अधिक          ६० पैसे                  ८५ पैसे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळ