शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

श्री रामाचा एकेरी उल्लेख: मंत्री मुश्रीफांच्या वाढदिवस जाहिरातीवर 'गोकुळ'ने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 17:22 IST

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ दुध संघाकडून देण्यात आलेल्या जाहीरातीवरुन राजकीय वातावरण तापले असतानाच यावर गोकुळने स्पष्टिकरण दिले आहे.

कोल्हापूरः ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ दुध संघाकडून देण्यात आलेल्या जाहीरातीवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या जाहिरातीत प्रभु श्रीरामांचा एकेरी उल्लेख झाल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. यांचे पडसाद आज, शुक्रवारी उमटले. याप्रकरणी मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी कागल पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढला. यावेळी त्यांनी मुश्रीफ हे जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप करत त्यांचा वाढदिवस रामनवमी दिवसी नसल्याचा पुरावा देखील दिला. यासर्व प्रकारानंतर गोकुळ दूध संघाच्या संचालकांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.गोकुळ दूध संघाच्या संचालकांनी प्रसिद्धीपत्रकातून हे स्पष्टीकरण दिले आहे. यात म्हटले आहे की, कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व अश्या अनेक वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या एका निधर्मी वागणुकीच्या मुश्रीफ यांच्या बाबतीत आम्हाला भावलेल्या या वैशिष्टयांचा उल्लेख आम्ही त्यांना देत असलेल्या शुभेच्छा जाहिरातीत केला.प्रभू श्रीरामचंद्र हे विश्वरुपी दैवत आहे, प्रत्येकाचेच. हिंदूंव्यतिरिक्त इतरही धर्मातील लोक श्रीरामप्रभुंची भक्ती करतात, त्यांना विचारांचा आदर्शही मानतात.  मुश्रीफ आपल्या मस्तकी भगवा अष्टगंध लावून श्रीरामप्रभूपुढे नतमस्तक होतात, तर ललाटी अबीर लावून विठुरायांची पालखीही खांद्यावरून अनवाणी चालत वाहतात. हे समस्त जनतेने बघितले आहे. या निधर्मीपणाचे अनेकांना कौतुकच वाटले आहे. एक राजकारणी म्हणून नव्हे; तर राजर्षी शाहू महाराजांच्या निधर्मी करवीर नगरीचं एक निधर्मी नेतृत्व म्हणूनच समस्त जनता त्यांच्याकडे पहाते.कोल्हापूर ही स्पृश्य, अस्पृश्य, धर्मकांड अश्या समाजद्रोही वृत्तीला थारा न देणारी भूमी आहे. इथे संकुचित मनोवृत्तीला थारा नाही. त्यातून जाहिरात ही एक कला आहे. या कलेतून साकार झालेल्या या जाहिरातीचे अनेकांनी मुक्त मनाने कौतुकही केले आहे. श्रीरामप्रभू विषयी आम्हांला नितांत आदर आणि मनात भक्तीही आहे. या जाहिरातीतून कोणाच्याही धार्मिक किंवा श्रीरामप्रभूशी वैयक्तीक बरोबरी करून भावना दुखावण्याचा यत्किंचितही प्रयत्न केलेला नाही असे म्हटले आहे.परंतु; या जाहिरातीबद्दल काहींनी विनाकारण घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यातून नामदार मुश्रीफ यांना जो मनस्ताप, त्रास झाला त्याबद्दल व या जाहिरातीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही दिलगिरी व्यक्त केली. हे प्रसिद्धीपत्रकावर चेअरमन विश्वास नारायण पाटील यांच्यासह संचालकांची नावे आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफGokul Milkगोकुळ