शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’ : फसवणूक केली तर संचालकांना गावात फिरणे मुश्कील : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 10:23 IST

‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मल्टिस्टेटचा ठराव रद्द करत असल्याचे स्वत:च सभेत सांगितले असताना पुन्हा दगाफटका करण्याचा उद्देश त्यांचा दिसतो. आता फसवणूक केली तर दूध उत्पादक संचालकांना गावात फिरू देणार नाहीत आणि त्यांना फसवणूक करायचीच असेल तर ती करावीच, असे उघड आव्हान आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

ठळक मुद्देफसवणूक केली तर संचालकांना गावात फिरणे मुश्कील सतेज पाटील यांचा इशारा

कोल्हापूर : ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मल्टिस्टेटचा ठराव रद्द करत असल्याचे स्वत:च सभेत सांगितले असताना पुन्हा दगाफटका करण्याचा उद्देश त्यांचा दिसतो. आता फसवणूक केली तर दूध उत्पादक संचालकांना गावात फिरू देणार नाहीत आणि त्यांना फसवणूक करायचीच असेल तर ती करावीच, असे उघड आव्हान आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.पाटील म्हणाले, ‘सत्तारूढ गटाने जे दूध संस्थेचे प्रतिनिधी नाहीत, अशा लोकांना आणून बसविले होते. त्याच लोकांनी गोंधळ सुरू केला. आमचे म्हणणे एवढेच आहे, रवींद्र आपटे यांनी मल्टिस्टेटचा ठराव रद्द करण्याची घोषणा केली. त्याची अंमलबजावणी करावी. त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत, ते त्यांनी बघावे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील निकालाची धास्ती घेऊनच मल्टिस्टेटचा ठराव रद्द केला आहे....तर ताकदीने सभेला गेलो असतो.अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मल्टिस्टेटचा ठराव रद्द केल्याचे जाहीर केले. त्यात आमदार पी. एन. पाटील यांनी स्वत: आमदार हसन मुश्रीफ यांना फोन करून, ‘हा ठराव रद्द करत आहे, तुम्ही सभेला जाऊ नका’, असा निरोप दिला; त्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही, असा दगाफटका करणार असतील तर आम्ही सगळे ताकदीने गेलो असतो, असे सतेज पाटील यांनी सांगितले.जीत भी मेरी और...सत्तारूढ गट आता कोणताही निर्णय घेऊ दे, कितीही फसवणूक करू देत. आता ‘जीत भी मेरी और पट भी मेरा’ असल्याचे पाटील यांनी सांगितले.प्रसिद्धीसाठी विरोधकांकडून गोंधळ-रवींद्र आपटे मल्टिस्टेटबाबत सविस्तर खुलासा केला असताना केवळ प्रसिद्धीसाठी काही मंडळींनी गोंधळ घातला; पण बहुसंख्य सभासदांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी दिल्याची माहिती संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.मागील सभेचे प्रोसीडिंग रद्द करण्याची कायद्यात तरतूद नाही. ठराव झाला, दोन राज्यांची मंजुरी मिळाली आणि केंद्रीय मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. याबाबत दूध उत्पादकांच्या मनात गैरसमज आहेत, ते दूर केल्याशिवाय आम्ही मल्टिस्टेट करणार नाही. याबाबत सरकारच्या पातळीवर जो काही पाठपुरावा करावा लागेल, तो केला जाईल.

भविष्यात दूध उत्पादकांकडून मागणी झाली आणि गरज निर्माण झाली तर त्यावेळची परिस्थिती पाहून मल्टिस्टेटबाबत निर्णय घेऊ, कारण नसताना ताणतणाव नको, म्हणून आम्ही निर्णय घेतला. विषयपत्रिकेवरील विषयाचे वाचन सुरू असताना काही लोकांनी गोंधळ सुरू केला; पण बहुसंख्य सभासद आमच्या बाजूने होते; त्यामुळे सभेचे कामकाज शांततेत पार पडल्याचे आपटे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Gokul MilkगोकुळSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर