उद्यान स्पर्धेत गोकुळ, डी. वाय. पाटीलची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:55 IST2020-12-05T04:55:29+5:302020-12-05T04:55:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : गार्डन्स क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या उद्यान स्पर्धेत मोठ्या गटात किर्लोस्कर ऑईल इंजिन लिमिटेड, मध्यम ...

Gokul, d. Y. Patil's bet | उद्यान स्पर्धेत गोकुळ, डी. वाय. पाटीलची बाजी

उद्यान स्पर्धेत गोकुळ, डी. वाय. पाटीलची बाजी

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : गार्डन्स क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या उद्यान स्पर्धेत मोठ्या गटात किर्लोस्कर ऑईल इंजिन लिमिटेड, मध्यम गटात गोकुळ दूध संघ, डी. वाय. पाटील हाॅस्पिटल, लहान गटात मौर्या अलाॅएज, खासगीमध्ये उषा थोरात (मोठा गट) आदींनी बाजी मारली. यंदा आयोजनाचेही ५० वे वर्ष आहे.

स्पर्धेचा बाजी मारलेल्यांमध्ये संस्था व सार्वजनिक : मध्यम गट - गोकुळ दूध संघ, डी. वाय. पाटील हाॅस्पिटल, लहान गट - महालक्ष्मी पशुखाद्य, मिनी गट - गोकुळ दूध, ताराबाई पार्क, कारखाने विभागात (मोठा गट)- किर्लोस्कर ऑईल इंजिन लिमिटेड, मौर्या अलाॅएज (लहान गट), मौर्या ग्लोब, मोर्या इंडस्ट्रीज (मिनी गट), खासगी विभागात मोठा गट- उषा थोरात, मेजर संजय शिंदे, केदार कुलकर्णी , मध्यम गट- शोभा तावडे, मोना पाटील, घनशाम सावलानी, लहान गट-रमेश शहा, मुग्धा वेंगुर्लेकर, पाम ग्रुव्ह, मिनी गट - नंदा नलवडे, डाॅ. सुभाष जगदाळे, विजयसिंह भोसले, -चिनार भिंगार्डे (विभागून), टेरेस प्रकारात संजय शेंद्रे, डाॅ. सरोज शिंदे, कल्पना थोरात, -विजयसिंह भोसले विभागून, बाल्कनी प्रकारात डाॅ. सरोज शिंदे, रंजिता काळेबेरे, अद्वैत पाटील-पंकज पवार (विभागून), किचन गार्डन प्रकारात शोभा तावडे,मनिष परिख, कल्पना थोरात यांचा समावेश आहे. स्पर्धेचे परीक्षक म्हणून वास्तूविशारद अमित कुलकर्णी, वनस्पती तज्ज्ञ डाॅ. संदीप गावडे, कृषीतज्ज्ञ डाॅ. प्रशांत सोनवणे यांनी बागेची पाहणी केली. स्पर्धेसाठी क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत, उपाध्यक्ष शशिकांत कदम, सचिव पल्लवी कुलकर्णी, राज अथणे, प्राजक्ता चरणे, वंदन पुसाळकर, आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Gokul, d. Y. Patil's bet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.