शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
2
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
3
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
4
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
5
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
6
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
7
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)
8
विराट कोहलीने क्रिकेटप्रेमीला पाकिस्तानी जर्सीवर दिली स्वाक्षरी, व्हिडीओ व्हायरल, अखेर समोर आली अशी माहिती
9
१८ कोटी घरातील माणसांच्या खात्यात वळवली; प्रशांत हिरेंसह कुटुंबीयांवर गुन्हा
10
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
11
VIDEO: महिला जीपमागे लपून काढत होती फोटो, अचानक मागून आला चित्ता अन् मग जे झालं...
12
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला 'या' शुभ मुहूर्तावर मंत्रांनी करा धन्वंतरीसह लक्ष्मी-कुबेराची विधिवत पूजा!
13
125cc Bikes: होंडा शाईन vs बजाज पल्सर; किंमत आणि फीचर्सबाबतीत कोणती चांगली?
14
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला मोठा धक्का, रशियन राजदूताने लाईव्ह अपमान केला
15
३ वर्षांत ३९% पर्यंत परतावा! 'या' म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल; कोणते आहेत फंड?
16
“PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास
17
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा दीपावलीचा सण!
18
“गणेश नाईक कसलेले पैलवान, अंतिम तेच विजयी होतील, शिंदे हे...”; संजय राऊतांचा मोठा दावा
19
AUS vs IND ODI Series Launch Event: 'जानी दुश्मन'सोबत गप्पा मारल्या; मग ते फोटो काढायला गेले, पण... (VIDEO)
20
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला का आणि कसे करावे यमदीपदान? अकाली मृत्यू खरंच टळतो का?

गोकूळ रणांगण : अपात्रतेवरून विभागीय सहनिबंधकाकडे १५ जणांचे अपील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 11:35 IST

Gokul Milk Election Kolhapur-गोकूळ उमेदवारी अर्ज नामंजूर करण्याच्या निर्णयाविरोधात गुरुवारी भारती डोेंगळे, बाबा नांदेकर, गंगाधर व्हसकोट्टी वसंतराव धुरे यांच्यासह १५ जणांनी विभागीय सहनिबंधकांकडे धाव घेतली. यात दहा जणांनी ऑनलाइन पद्धतीने तर ५ जणांनी प्रत्यक्ष जाऊन अर्ज केले. यावर आता गुरुवारी (दि.१५) सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देगोकूळ रणांगण : अपात्रतेवरून विभागीय सहनिबंधकाकडे १५ जणांचे अपील गुरुवारी होणार सुनावणी

कोल्हापूर: गोकूळ उमेदवारी अर्ज नामंजूर करण्याच्या निर्णयाविरोधात गुरुवारी भारती डोेंगळे, बाबा नांदेकर, गंगाधर व्हसकोट्टी वसंतराव धुरे यांच्यासह १५ जणांनी विभागीय सहनिबंधकांकडे धाव घेतली. यात दहा जणांनी ऑनलाइन पद्धतीने तर ५ जणांनी प्रत्यक्ष जाऊन अर्ज केले. यावर आता गुरुवारी (दि.१५) सुनावणी होणार आहे.गोकूळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकींतर्गत छाननीमध्ये अनेकांचे अर्ज अपात्र ठरले. दूध पुरवठा व पशूखाद्य उचलीच्याबाबतीत असणाऱ्या अटीवर आक्षेप घेत अपात्र ठरलेल्यांना अपीलाची सुट देण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी १५ जणांनी विभागीय सहनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्याकडे अर्ज दाखल केले.

यात राधानगरीतून कासारवाडा येथील शरद पाडळकर, तुरंबे येथून उमर पाटील, चंद्रे येथून दिनकर पाटील, घोटवडे येथून भारती डोंगळे, पन्हाळा तालुक्यातील माजगाव येथून बळवंत कांबळे, यवलूज येथील शशिकांत आडनाईक व मानसिंग पाटील, करवीर तालुक्यातील शाहूनगर परिते येथून अजित पाटील, गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथील गंगाधर व्हसकोट्टी, महागाव येथून विनायक पाटील व आण्णासाहेब पाटील, उत्तूरमधून वसंतराव धुरे, भूदरगड तालुक्यातील नांदोली येथील यशवंत ऊर्फ बाबा नांदेकर, कागल तालुक्यातील बामणी येथील मारुती पाटील यांचा समावेश आहे.एकही माघार नाहीगोकूळ दूध संघाच्या २१ जागासाठी ४८२ जणांनी दावेदारी दाखल केली होती; पण छाननीत यातील ७५ अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे अजूनही २४१ जण रिंगणात आहेत. त्यातील कोण माघार घेणार, याची उत्सुकता आहे. बुधवारी अरुण नरके व स्निग्धा चेतन नरके या दोघांनी माघार घेत चेतन नरके यांचा मार्ग मोकळा केला. गुरुवारी एकानेही उमेदवारी माघार न घेतल्याने सत्ताधारी व विरोधकांची डोकेदुखी वाढली आहे. माघारीसाठी २० एप्रिल ही शेवटची मुदत असली तरी अजून अकरा दिवस माघारीसाठी हातापाया पडण्याची वेळ आघाडीच्या नेत्यावर येणार आहे.

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर