‘गोकुळ’बरोबर ‘वारणा’चीही दूध दरवाढ

By Admin | Updated: June 11, 2014 01:15 IST2014-06-11T01:14:26+5:302014-06-11T01:15:57+5:30

आजपासून अंमलबजावणी : फक्त म्हैस दूध दरातच वाढ; कोल्हापुरात ४६ रुपये लिटर

'Gokul' also 'Varna' milk price hike | ‘गोकुळ’बरोबर ‘वारणा’चीही दूध दरवाढ

‘गोकुळ’बरोबर ‘वारणा’चीही दूध दरवाढ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाबरोबर (गोकुळ) वारणा सहकारी दूध संघानेही म्हशीच्या खरेदी व विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवाढीची अंमलबजावणी उद्या, बुधवारपासून होणार आहे. नवीन दरवाढीमुळे कोल्हापुरात म्हशीचे दूध ४६, तर मुंबईत ५० रुपये लिटरने ग्राहकांना घ्यावे लागणार आहे.
‘गोकुळ’ने गायीच्या विक्री दरात पंधरा दिवसांपूर्वी वाढ केली होती. त्यामुळे शनिवारी त्यांनी म्हैस दूध खरेदी व विक्री, तर गाय दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. म्हैस व गाय दूध खरेदी दरात दीड रुपया, तर विक्री दरात दोन रुपयांची वाढ केली आहे. वाढीव दराची अंमलबजावणी उद्या, बुधवारपासून केली जाणार आहे.
दरम्यान, ‘गोकुळ’ पाठोपाठ वारणा सहकारी दूध संघानेही म्हैस खरेदी व विक्री दरात अनुक्रमे दीड व दोन रुपयांची लिटरमागे वाढ केली आहे. वारणा संघाने गायीच्या खरेदी व विक्री दरात २१ मार्चला दरवाढ केली होती. त्यामुळे आता त्यांनी दरवाढ केलेली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: 'Gokul' also 'Varna' milk price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.