हिंदीचे गाढे अभ्यासक गोकाककर यांचे निधन

By Admin | Updated: June 9, 2014 01:11 IST2014-06-09T01:01:20+5:302014-06-09T01:11:52+5:30

देहदान : मृत्यूनंतरही जपली सामाजिक बांधीलकी

Gokakkar dies in Hindi | हिंदीचे गाढे अभ्यासक गोकाककर यांचे निधन

हिंदीचे गाढे अभ्यासक गोकाककर यांचे निधन

गडहिंग्लज : हिंदीचे गाढे अभ्यासक, साहित्यिक-समीक्षक व बहुआयामी ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते डॉ. सुधाकर गोपाळ गोकाककर (वय ७६) यांचे अल्पशा आजाराने रविवारी पुणे येथे निधन झाले. काही महिन्यांपासून ते कर्करोगाने आजारी होते. पुणे येथील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची ज्येष्ठ कन्या अनघा यांच्या घरी रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
पुण्याहून रात्री नऊच्या सुमारास त्यांचे पार्थिव गडहिंग्लज येथे आणल्यानंतर नेहरू चौकातील त्यांच्या निवासस्थानासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह हजारो गडहिंग्लजकरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर मृत्यूपूर्वी त्यांनी केलेल्या संकल्पानुसार त्यांचा मृतदेह कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागाकडे संशोधनासाठी देण्यात आला.
ज्येष्ठ समाजवादी नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांचे निकटचे सहकारी व पुरोगामी चळवळीतील खंदे कार्यकर्ते म्हणून त्यांची सर्वांना ओळख होती. त्यांच्या पश्चात मुलगा अंगद, कन्या अनघा व अर्चना, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gokakkar dies in Hindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.