शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वळीव पावसाने गोकाक धबधबा प्रवाहित, पर्यटकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 13:11 IST

बेळगाव : गोकाक तालुक्यातील घटप्रभा नदीवर असणारा धबधबा मे महिन्यात प्रवाहित झाला आहे. गेल्या चार दिवसांत वळवाच्या पावसाने जोरदार ...

बेळगाव : गोकाक तालुक्यातील घटप्रभा नदीवर असणारा धबधबा मे महिन्यात प्रवाहित झाला आहे. गेल्या चार दिवसांत वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हा धबधबा पूर्णपणे प्रवाहित झाल्याने पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. गोकाक धबधब्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे धबधबा ओसंडून वाहत आहे.बेळगावपासून ६० किलोमीटरवर असणारा गोकाकचा धबधबा ऐन उन्हाळ्यात अशापद्धतीने प्रवाहित झाल्याने पर्यटकातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ऐन उन्हाळ्यात धबधबा प्रवाहित झाल्याने निसर्ग सौंदर्यदेखील खुलले आहे. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा बेळगाव जिल्ह्यातील गोकाक धबधबा वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. परंतु धबधबा परिसरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे उन्हाळ्यातच हा धबधबा प्रवाहित झाला आहे. निसर्गाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटकदेखील गर्दी करू लागले आहेत.गेल्या काही दिवसांपासून विविध भागांत सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे घटप्रभा नदी प्रवाहित झाली असून गोकाक धबधब्यालाही पाणी आले आहे. कोकण भागात पावसाचा जोर वाढल्याने बेळगावातील घटप्रभा नदीच्या प्रवाहात वाढ झाली असून या नदीवर असणारा गोकाकचा धबधबा प्रवाहित झाला आहे. धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला नसला तरी उन्हाळी पर्यटनासाठी पर्यटकांनी हजेरी लावली आहे.गोकाक तालुक्यातील धबधबा अलीकडे कमालीचे लोकप्रिय झालेले ठिकाण आहे. तरुणाईबरोबरच आबालवृद्धांना या धबधब्यासह येथील वातावरणाची भुरळ पडली आहे. पावसाळ्यात येथील वातावरण अत्यंत मनमोहक असते. हा नयनरम्य परिसर व नजारे डोळ्याने पाहून मनात साठवण्यासाठी व कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी धडपड सुरू असते मात्र पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पर्यटकांना गोकाक धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्याची संधी मिळाल्याने पर्यटकातून आनंद व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकbelgaonबेळगावRainपाऊस