शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार

By admin | Updated: November 17, 2015 00:45 IST

वसंतराव मुळीक : महासंघाच्या बैठकीत इशारा; प्रसंगी कायद्यात बदल करण्याची मागणी

कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा विषय आता उच्च न्यायालयात आहे. या ठिकाणी आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने भक्कमपणे बाजू मांडावी, प्रसंगी कायद्यात बदल करून समाजाला न्याय द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सोमवारी येथे दिला.मराठा आरक्षणाची सद्य:स्थिती व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे मराठा महासंघातर्फे आयोजित बैठकीत ते बोलत होते. उत्तम जाधव, मिलिंद ढवळे-पाटील, संतोष सावंत, सर्जेराव पाटील, शैलजा भोसले आदी उपस्थित होते. मुळीक म्हणाले, राज्य सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी उच्च न्यायालयात असलेला दावा भक्कमपणे लढवावा. प्रसंगी कायद्यात बदल करून मराठ्यांना न्याय द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. ‘मराठा भवन’ हे फक्त मराठा समाजाचे न राहता ते ‘बहुजनांचे मंदिर’ होईल, या पद्धतीने त्याची रचना केली जाणार आहे. मराठा महासंघाच्या १२३८ गावांमध्ये शाखा काढण्याचे नियोजन आहे. यामधील १०१ शाखा पुढील वर्षात सुरू होणार आहेत. ते म्हणाले, अंबाबाईला विष्णूची पत्नी बनविण्याचा घाट घातला जात आहे. अंबाबाईच्या मस्तकावरील नाग नष्ट करून सिंहाचीही ओळख पुसण्याचे षङयंत्र रचले जात आहे. या विरोधात प्रबोधनपर चळवळ उभी करण्यात आली आहे. जोपर्यंत अंबाबाईच्या मस्तकावर नाग घडविला जात नाही तोपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे. त्याचबरोबर मंदिरातील देवाच्या गाभाऱ्यातील पैशावर पुजारी मालकी हक्क सांगतात. त्या विरोधातही लढा उभारून हे पैसे देवस्थानकडे जावेत यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न केले जातील. आमचा लढा दक्षिणा हडपणाऱ्या पुजाऱ्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे सर्व समाज बांधव आमच्या अंबाबाईच्या प्रबोधन चळवळीत सहभागी झाले आहेत.मारुती मोरे म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी प्रत्येक ग्रामपंचायतीमधून मासिक सभांचे व विशेष सभांचे ठराव पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोळा करावेत.यावेळी शिवाजीराव गराडे, शिवाजीराव पाटील, अवधूत पाटील, शंकरराव शेळके, संगीता राणे, दीपाली डोणे, संदीप पाटील, आदी उपस्थित होते. उत्तम जाधव यांनी स्वागत केले. शशिकांत पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)