शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

अवघ्या तीन तासांत गोव्यात जाता येणार आहे-संकेश्वर ते बांदा मार्गाचा ‘डीपीआर’ करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 01:04 IST

कोकणला आणखी नजीक आणण्यासाठी संकेश्वर ते बांदा १०६ किलोमीटर अंतराच्या नव्या राष्टय महामार्गाचा ‘डीपीआर’(विकास आराखडा) करण्याचे आदेश राष्टÑीय रस्ते विकास महामंडळाने दिले आहेत.

ठळक मुद्देनव्या महामार्गाला मंजुरी; १०६ कि.मी.चे अंतर --‘राष्टय रस्ते विकास’चा आदेश

तानाजी पोवार ।कोल्हापूर : कोकणला आणखी नजीक आणण्यासाठी संकेश्वर ते बांदा १०६ किलोमीटर अंतराच्या नव्या राष्टय महामार्गाचा ‘डीपीआर’(विकास आराखडा) करण्याचे आदेश राष्टÑीय रस्ते विकास महामंडळाने दिले आहेत. त्याचा ‘डीपीआर’ भारतीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. कोकणकडील व्यापाराला चालना मिळावी, परराज्यातून, तसेच मुंबई-पुणे मार्गे येणाऱ्या पर्यटकांना या महामार्गातून गोव्याकडे जाता यावे; यासाठी या नव्या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करण्यात येत आहे.

सध्याच्या स्थितीत तवंदी घाट, शिपूर, आजरामार्गे गोवा अशी वाहतूक सुरू आहे. या मार्गावर वाहनांची प्रचंड संख्या आहे; पण रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पर्यटकांसह वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नव्याने होणारा हा राष्टÑीय महामार्ग पर्यटकांच्या आणि वाहनचालकांच्या सोईचा होणार आहे. हा ‘डीपीआर’ करताना मार्र्गावरील वाहतुकीची संख्या, मार्गासाठीचा अपेक्षित खर्च, भूसंपादनाची प्रक्रिया, जमीनधारकांना द्यावा लागणारा योग्य मोबदला, याचाही विचार होणार आहे. हा ‘डीपीआर’ तयार करून तो मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे.चौपदरीकरण की सहापदरीकरण?परिसरातील जुन्या मार्गावरून ये-जा करणाºया वाहनांच्या संख्येवरून हा नवा महामार्ग चौपदरीकरण की सहापदरीकरण करायचा हे विकास आराखड्यामध्ये निश्चित करण्यात येणार आहे.कोकण व्यापाराला चालनासध्याच्या स्थितीत दळणवळणाच्या दृष्टीने कोकणशी अनेक राज्यांचा संपर्क वाढला आहे. कोकणकडील व्यापाराला या नव्या महामार्गामुळे चालना मिळणार आहे. त्याचा महाराष्टÑ, कर्नाटकसह इतर राज्यांना फायदा होणार आहे.गडहिंग्लज, आजरेकरांची उत्सुकताहा नवा महामार्ग गडहिंग्लज आणि आजरा शहरांतून जाणार की बायपास, याबाबत दोन्हीही शहरवासीयांना उत्सुकता आहे; पण तो शहरातून नेण्यास त्यांचा विरोध राहणार असल्याचे दिसून येते.नवा महामार्ग असा असेल..सुमारे १०६ कि.मी. लांबीचा हा नवा राष्टÑीय महामार्ग संकेश्वर, गडहिंग्लज, आजरा, आंबोली, बांदा असा असेल. या महामार्गावर कमीत कमी वळण, बाह्यवळण असतील. या मार्गावरून अवघ्या तीन तासांत गोव्यात जाता येणार आहे; त्यामुळे हा महामार्ग वाहनधारकांना सोईचा ठरणार आहे.‘सावंतवाडी’करांची इच्छामुंबई ते गोवा हा राष्टÑीय महामार्ग सावंतवाडी गावाबाहेरून बाय्ापास वळवून पुढे गेला. संकेश्वर ते बांदा हा नवा महामार्ग सावंतवाडी शहरापासून किमान ७ ते ८ कि.मी. अलीकडून वळण घेऊन पुढे जात आहे; पण हा मार्र्ग सावंतवाडी शहरातून जावा, अशी त्यांची इच्छा आहे; त्यामुळे या शहरातील व्यापारीकरणाला चालना मिळणार आहे.

टॅग्स :highwayमहामार्गpwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूरgoaगोवा