देव्हारे गोविंदा पथकाने दिला गुटखा बंदीचा संदेश
By Admin | Updated: August 22, 2014 22:47 IST2014-08-22T22:36:39+5:302014-08-22T22:47:12+5:30
एक बाहुले रूपी व्यसनाचा राक्षस बनवून,

देव्हारे गोविंदा पथकाने दिला गुटखा बंदीचा संदेश
देव्हारे : देव्हारे (ता. मंडणगड) येथील गोविंदा पथकाने दारू व गुटखा बंदीचा संदेश देऊन अनोख्या पध्दतीने दहीहंडी उत्सव साजरा केला. या गोविंदा पथकाने एक बाहुले रूपी व्यसनाचा राक्षस बनवून, त्याला दारूचे रिकामे बॉक्स व गुटख्याच्या रिकाम्या पिशव्या लावल्या होत्या. दारू, गुटखा सोडा, जीवन जोडा असा संदेश त्या बाहुल्यावर लिहिलेला होता. दारू, गुटख्यापासून दूर राहा, असा संदेश तरूण पिढीला दिला़
देव्हारे येथील तीन वाड्यांची तीन वेगवेगळी गोविंदा पथके आहेत. त्यातील उत्तरवाडीच्या गोविंदा पथकाने हा संदेश दिला. (वार्ताहर)
देव्हारे येथील गोविंदा पथकाने प्रतिकात्मक पुतळा बनवून दारू आणि गुटख्यापासून दूर राहण्याचा तरुणाईला संदेश दिला.