शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

महिला कैद्यांच्या हातांनी घडविला देव... इको-फ्रेंडली गणेशमूर्ती : बरॅकमध्ये होणार प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:43 IST

आयुष्यात घडलेल्या चुकीने शिक्षा भोगत असलेल्या कळंबा कारागृहातील महिला कैद्यांचे हात सध्या सुबक आणि आकर्षक अशा इको-फ्रेंडली गणेशमूर्ती साकारण्यात गुंतले आहेत. या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना कारागृहातीलच वेगवेगळ्या बरॅकमध्ये करण्यात

ठळक मुद्दे पुढील वर्षीपासून विक्री

कोल्हापूर : आयुष्यात घडलेल्या चुकीने शिक्षा भोगत असलेल्या कळंबा कारागृहातील महिला कैद्यांचे हात सध्या सुबक आणि आकर्षक अशा इको-फ्रेंडली गणेशमूर्ती साकारण्यात गुंतले आहेत. या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना कारागृहातीलच वेगवेगळ्या बरॅकमध्ये करण्यात येणार असून, पुढील वर्षीपासून या गणेशमूर्ती सर्वसामान्य भाविकांसाठीही उपलब्ध करण्याचा व्यवस्थापनाचा विचार आहे.कळंबा कारागृहातर्फे कारागृह हे शिक्षागृह नव्हे, तर सुधारगृह आहे, या भावनेतून येथील कैद्यांसाठी अनेक विधायक उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे. येथील विविध उद्योगांतून मिळणारा रोजगार, कैदी व मुलांची गळाभेट हे या उपक्रमशीलतेचाच एक भाग. येथील कैदी गेल्या दोन वर्षांपासून श्री अंबाबाई भाविकांसाठी लाडूप्रसाद बनवितात. आता त्यापुढचे पाऊल टाकत येथील महिला कैद्यांनी गणेशमूर्ती घडविण्यास सुरुवात केली आहे.

भागीरथी महिला संस्थेच्या वतीने काही दिवसांपूर्वी महिला कैद्यांना गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. संस्थेच्या प्रशिक्षकांनी महिलांकडून प्रत्यक्ष मूर्तीही बनवून घेतल्या. या प्रशिक्षणानंतर संस्थेतर्फे गणेशमूर्ती घडविण्यासाठीची माती (बॉम्बे क्ले), गबाळा, रंग असा कच्चा मालही पुरविण्यात आला. खरे तर गणराय साकारण्याचा हातखंडा कुंभारबांधवांचा; पण येथील महिला कैदीही आपल्या कौशल्यगुणांचा वापर करून गेल्या चार-पाच दिवसांपासून गणेशमूर्ती साकारण्यात गुंतल्या आहेत.

कारागृहाच्या आवारातच जवळपास २५ ते ४० गणेशमूर्ती तयार करण्यात येत आहेत. कळंबा कारागृहातही दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. प्रत्येक बरॅकमध्ये एका गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. उपाहारगृहातून वस्तूंची खरेदी करून सुरेख आरास केली जाते. दहा दिवस सकाळ-संध्याकाळ आरती, विविध स्पर्धा व शेवटच्या दिवशी गणेशमूर्ती विसर्जन केले जाते. महिला कैद्यांनी पहिल्यांदाच बनविलेल्या या गणेशमूर्तींची कारागृहाच्या प्रत्येक बरॅकमध्ये प्रतिष्ठापना होणार आहे.पहिल्या वर्षीच्या या प्रयत्नानंतर पुढील वर्षीपासून मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती तयार करून महिला कैद्यांच्या हातांना काम देण्याचा कारागृह व्यवस्थापनाचा विचार आहे. या मूर्ती सर्वसामान्य भाविकांसाठीही उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. 

महिला कैद्यांमधील कलाकौशल्याला वाव मिळावा, या प्रयत्नातून त्यांना गणेशमूर्ती घडविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यंदा या गणेशमूर्ती कारागृहातच प्रतिष्ठापित केल्या जातील. पुढील वर्षीपासून मात्र त्या सर्वसामान्य भाविकांना उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.- शरद शेळकेअधीक्षक, कळंबा कारागृहकारागृहातून बाहेर पडल्यानंतर या महिलांनाही रोजगाराचे साधन मिळावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व समाजाने त्यांना सहजरीत्या स्वीकारावे यासाठी संस्था प्रयत्नशील असते. त्या उद्देशातूनच गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भविष्यात त्याची व्याप्ती वाढण्याचा प्रयत्न आहे.- अरुंधती महाडिक अध्यक्षा, भागीरथी महिला संस्था

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjailतुरुंगganpatiगणपती