शिरोळमध्ये गोवा बनावटीची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:51 IST2020-12-05T04:51:46+5:302020-12-05T04:51:46+5:30

यमनाप्पा आण्णासोा वडर (वय ३३), युवराज नागाप्पा वडर (२१), हृषिकेश कृष्णा पाटील (२१, तिघे रा. समतानगर), विक्रम बाळासोा गवळी ...

Goa-made liquor seized in Shirol | शिरोळमध्ये गोवा बनावटीची दारू जप्त

शिरोळमध्ये गोवा बनावटीची दारू जप्त

यमनाप्पा आण्णासोा वडर (वय ३३), युवराज नागाप्पा वडर (२१), हृषिकेश कृष्णा पाटील (२१, तिघे रा. समतानगर), विक्रम बाळासोा गवळी (३४, रा. शिरटी) व तानाजी मोहन थोरवत (३४, रा. घालवाड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून दारूचे सोळा बॉक्स जप्त केले. ही कारवाई निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक वर्षा पाटील, राहुल गुरव, जी. एच. हजारे, सुभाष कोले, विलास पवार, प्रसन्नजित कांबळे यांनी केली. शिरोळ तालुक्यात अशाप्रकारे अवैध मद्यनिर्मिती, साठा, विक्री व वाहतूक आढळल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याचे निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

Web Title: Goa-made liquor seized in Shirol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.