बोंजुर्डीनजीक गोवा बनावटीची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:30 IST2021-09-08T04:30:26+5:302021-09-08T04:30:26+5:30

या दोघांनी चिरका येथे ठेवलेले विविध प्रकारचे ५२ बाॅक्स व गोल्डन रंगाची (एमएच ०४ बीएस ५७९०) होंडा सिटी गाडी ...

Goa-made liquor seized near Bonjurdi | बोंजुर्डीनजीक गोवा बनावटीची दारू जप्त

बोंजुर्डीनजीक गोवा बनावटीची दारू जप्त

या दोघांनी चिरका येथे ठेवलेले विविध प्रकारचे ५२ बाॅक्स व गोल्डन रंगाची (एमएच ०४ बीएस ५७९०) होंडा सिटी गाडी असा एकूण ५,५३,४४० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज विभागाचे उपायुक्त वार. एम. पवार, राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूरचे अधीक्षक रवींद्र आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी निरीक्षक एम. एस. गरुड, दुय्यम निरीक्षक जी. एन. गुरव, ए. बी. वाघमारे, एस. आर. ठोंबरे, एन. एस. केरकर, जवान ए. आर. जाधव, संदीप चौगुले यांनी ही कारवाई केली.

फोटो ओळी : बोंजुर्डी (ता. चंदगड) नजीक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून जप्त केलेला दारूसाठा.

क्रमांक : ०७०९२०२१-गड-१३

Web Title: Goa-made liquor seized near Bonjurdi