वारणानगरमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:21 IST2021-01-04T04:21:11+5:302021-01-04T04:21:11+5:30

वारणानगर - येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती आणि सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध ...

Glory to the work of Krantijyoti Savitribai Phule in Varanasi | वारणानगरमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव

वारणानगरमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव

वारणानगर - येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती आणि सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते.

प्रारंभी डॉ. प्रीती शिंदे-पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विविध स्पर्धांमध्ये २००हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. विजेत्यांचे वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. वासंती रासम यांनी अभिनंदन केले.

प्रा. दीपाली पाटील यांनी प्रास्ताविक केले. सांस्कृतिक विभागाच्या प्रा. डॉ. प्रीती शिंदे-पाटील, प्रा. वर्षा राजपूत, प्रा. सीमा नलवडे यांनी स्पर्धांचे संयोजन केले. परीक्षक म्हणून प्रा. दिलीप घाडगे, बळीराम आभ्रंगे, उत्तम पाटील, शिल्पा पाटील, संतोष जाधव, संदीप लाड यांनी काम पाहिले. प्रा. संध्या साळोखे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. रामकृष्ण भांगरे यांनी आभार मानले.

स्पर्धेतील विजेते - अभंग गायन - श्रद्धा लायकर, तेजस्विनी लोहार (विभागून),

तनिषा लोहार, प्राची खोत, उत्तेजनार्थ - स्वाती गुरव.

वक्तृत्व स्पर्धा - प्रांजल खामकर, सानिका भोसले, पृथ्वी झोरे, उत्तेजनार्थ समृद्धी बसरे, अमृता जाधव.

सुंदर स्वाक्षरी स्पर्धा -

वरिष्ठ महाविद्यालय -

अंकिता गावडे, अंजली गौड, श्रीधर मिस्त्री, उत्तेजनार्थ - प्रज्ञा गायकवाड, रोहित राम.

कनिष्ठ महाविद्यालय - राज सनगरे, प्रेरणा गवसेकर, श्रुती जाधव, उत्तेजनार्थ - सानिका चव्हाण, संतोषी पाताळे, तनिषा लोहार.

.......

फोटो ओळी.. वारणा महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, प्रा. प्रिती शिंदे-पाटील व प्राध्यापक उपस्थित होते.

Web Title: Glory to the work of Krantijyoti Savitribai Phule in Varanasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.