मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत गलेफ विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:24 IST2021-05-10T04:24:39+5:302021-05-10T04:24:39+5:30

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतील कहरामुळे यंदाही हजरत बाबूजमालसाहेब दर्ग्यातील उरुस अत्यंत साधेपणाने होत आहे. रविवारी ...

Gleeff ritual in the presence of a few people | मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत गलेफ विधी

मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत गलेफ विधी

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतील कहरामुळे यंदाही हजरत बाबूजमालसाहेब दर्ग्यातील उरुस अत्यंत साधेपणाने होत आहे. रविवारी रात्री गलेफ विधी मोजक्याच पाच मुजावरांच्या उपस्थितीत झाला.

हजरत पीर (शहा जमाल) कलंदर दर्गा शरीफ येथे शनिवारी रात्री गंध लावण्यात आला तर रविवारी रात्री फतेहा पठण करून दुआ झाली. त्यांनतर दर्ग्याभोवती फेरी मारून पाच मुजावरांनी गलेफ चढवला. जगाचा कोरोनापासून बचाव कर, अशी दुआ मागण्यात आली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.

यावेळी दर्गाहचे मुख्य खादीम लियाकत मुजावर, ऐनुद्दीन मुल्ला, अल्ताफ मुतवल्ली, शकील मुतवल्ली, इम्तियाज मुतवल्ली, जमाल झारी उपस्थित होते.

फोटो : ०९०५२०२१-कोल-बाबुजमाल

फोटो ओळी : कोल्हापुरातील हजरत बाबूजमालसाहेब दर्ग्यातील उरुसानिमित्त रविवारी रात्री मोजक्याच पाच मुजावरांच्या उपस्थितीत गलेफ विधी झाला.

(छाया : नसीर अत्तार)

Web Title: Gleeff ritual in the presence of a few people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.