दगड मारून पोलीस व्हॅनची फोडली काच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:22 IST2021-01-18T04:22:50+5:302021-01-18T04:22:50+5:30

कोल्हापूर : कनाननगरात शनिवारी मध्यरात्री युवकांंच्या दोन गटात वादावादीची घटना घडली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी ...

The glass of the police van was shattered by throwing stones | दगड मारून पोलीस व्हॅनची फोडली काच

दगड मारून पोलीस व्हॅनची फोडली काच

कोल्हापूर : कनाननगरात शनिवारी मध्यरात्री युवकांंच्या दोन गटात वादावादीची घटना घडली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी संशयित भोला ऊर्फ अजय सकटे (वय २४, रा. कनाननगर) याने रागातच दगड मारून पोलीस व्हॅनची काच फोडली. शासकीय वाहनाचे नुकसान केल्याबद्दल त्याला शाहूपुरी पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली.

शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कनाननगर येथे शनिवारी मध्यरात्री दोन गटात वादावादी सुरू होती. रात्रीचे पोलिसांचे गस्त पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी सोनू सकटे, भोला सकटे, अल्ताफ सय्यद, आसिफ सय्यद यांच्यात हाणामारी सुरू होती. पोलिसांनी जमावाला पांगवले. जमावातील भोला ऊर्फ अजय सकट याने पळून जाताना पोलीस व्हॅनवर दगड फेकून मारला. त्यामुळे व्हॅनची पुढील काच फुटून सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, पण तो हाती लागला नाही. शासकीय वाहनाचे नुकसान केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा नोंदवला. रविवारी सायंकाळी भोला सकटे याला अटक केली.

Web Title: The glass of the police van was shattered by throwing stones