दिव्यांगांना स्वतंत्र अंत्योदय शिधापत्रिका द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST2021-02-09T04:26:35+5:302021-02-09T04:26:35+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाने दिव्यांगांना स्वतंत्र अंत्योदय शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाची जिल्ह्यात अद्यापही अंमलबजावणी केलेली ...

दिव्यांगांना स्वतंत्र अंत्योदय शिधापत्रिका द्या
कोल्हापूर : राज्य शासनाने दिव्यांगांना स्वतंत्र अंत्योदय शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाची जिल्ह्यात अद्यापही अंमलबजावणी केलेली नाही. त्याची अंमलबजावणी करून दिव्यांगांना स्वतंत्र अंत्योदय शिधापत्रिका द्याव्यात, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेतर्फे सोमवारी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्याकडे केली.
राज्य शासनाने दिव्यांगांना २१ डिसेंबर २०२० ला एका शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्र अंत्योदय शिधापत्रिका देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी अद्यापही तालुका अथवा शहर पातळीवर झालेली नाही. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करून दिव्यांगांना त्वरित स्वतंत्र अंत्योदय शिधापत्रिका द्यावी. ज्या दिव्यांगांचा अद्यापही विवाह झालेला नाही, अशा दिव्यांगांना कुटुंबाच्या शिधापत्रिकेत अंत्योदयचा शिक्का मारून द्यावा, असे आदेश जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना द्यावेत, असे निवेदन संघटनेतर्फे जिल्हा पुरवठा अधिकारी कवितके यांना दिले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने, उपाध्यक्ष विकास चौगुले, युनुस शेख, विष्णुकांत पाटील, राजाराम भोईटे, जालिंदर कांबळे, जयश्री शिंदे, कल्पना वावरे, रंजना दुलाईकर, उज्ज्वला चव्हाण उपस्थित होते.