सत्ता द्या; महाराष्ट्र टोलमुक्त करू --महाराष्ट्रात प्रगतीसाठी राष्ट्रवादी पक्षाशिवाय पर्याय नाही.
By Admin | Updated: October 13, 2014 00:38 IST2014-10-13T00:37:33+5:302014-10-13T00:38:51+5:30
सुप्रिया सुळे यांचे आवाहन

सत्ता द्या; महाराष्ट्र टोलमुक्त करू --महाराष्ट्रात प्रगतीसाठी राष्ट्रवादी पक्षाशिवाय पर्याय नाही.
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समाजकारणाला महत्त्व देणारा आहे, दिलेला ‘शब्द’ पाळणारे नेतृत्व आमच्याकडे असल्याने महाराष्ट्रात एकहाती सत्ता द्या, संपूर्ण महाराष्ट्र टोलमुक्त करू, त्याची सुरुवात कोल्हापुरातूनकेली जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज कोल्हापुरात दिली. राष्ट्रवादीचे कोल्हापूर उत्तरचे उमेदवार आर. के. पोवार यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार प्रारंभप्रसंगी अजित पवार यांनी शंभर दिवसांत कोल्हापूर टोलमुक्त करण्याचे अभिवचन दिले आहे. आम्ही दिलेले वचन पाळणारी मंडळी असल्याने आमच्याबरोबर विश्वासाचे नाते आहे. कोणत्याही परिस्थितीत कोल्हापुरातून टोल घालविला जाईल. पाणी, महिलांच्या प्रश्नांसह सुरक्षित महाराष्ट्रासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी केले. द्रष्टे नेते राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीत आर. के. पोवार यांचासारखा निष्ठावंत कार्यकर्ता लढत आहे, त्यांना साथ द्या. कोल्हापूर शहरातील प्रश्न कोणी मार्गी लावावेत, याची जाणीव येथील जनतेला आहेत. निवडणुकीच्या तोंडावर काही मंडळी उलटसुलट बोलत आहेत, पण ज्यांनी विधिमंडळात चहा पिण्यासाठी व जांभया देण्यासाठी असे दोन वेळाच तोंड उघडले ती मंडळी कोल्हापूरचा काय विकास करणार, अशी टीकाही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. गेले ३५ वर्षे सामान्य माणूस म्हणून कोल्हापूर शहरात काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता दिली पण कोणाकडे खंडणी मागितली नाही. जमेल तसे सामान्य माणसाला आधार देण्याचे काम केले असून आता पक्षाची शहरात मोठी ताकद आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचे आर. के. पोवार यांनी सांगितले. नगरसेवक राजू लाटकर यांनी मनोगत व्यक्त केले. सभेला माजी महापौर सुनीता राऊत, कादंबरी कवाळे, पद्मा तिवले, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, परिक्षित पन्हाळकर, जयकुमार शिंदे, जहिदा मुजावर आदी उपस्थित होते. आदिल फरास यांनी आभार मानले.
परिवर्तनाच्या लढाईत यड्रावकरांचा विजय---सुप्रिया सुळे यांचा विश्वास : जयसिंगपूर येथे जाहीर सभा
जयसिंगपूर : महाराष्ट्रात प्रगतीसाठी राष्ट्रवादी पक्षाशिवाय पर्याय नाही. सहकारी, शिक्षण संस्थांबरोबरच जयसिंगपूरच्या विकासासाठी ८० कोटीचा निधी कर्तृत्वाच्या जोरावर खेचून आणणाऱ्या राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना साथ देण्याची गरज आहे. परिवर्तनाच्या या लढाईत शिरोळची जनता यड्रावकरांना निश्चित विजयी करेल, असा विश्वास खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. येथील विक्रमसिंह क्रिडांगणावर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या. खा. सुळे पुढे म्हणाल्या, कठीण प्रसंगात देशाचे नेते शरद पवार यांच्या सोबत महाराष्ट्रातील मोजकीच माणसे उभी राहिली, त्यामध्ये यड्रावकर कुटूंबाचा समावेश होता. शरद पवार यांच्यावर टिका केल्याशिवाय काहींंचा पक्षच चालत नाही, विरोधक हा दिलदार असावा तो रिकामटेकडा नसावा अशी टिका खा. शेट्टी यांचे नाव न घेता त्यांनी केली. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, रत्नाप्पाण्णा कुंभार व शामराव पाटील-यड्रावकर यांच्या विचाराचा व कार्याचा वारसा जोपासून कायमपणे समाजासाठी नाळ जोडून ठेवली आहे. तालुक्याला बदल हवा आहे, जनतेला काम करणाऱ्या माणसाची गरज आहे, असे सांगून यड्रावकर पुढे म्हणाले, तालुक्यात अडीचशे कॉटचे रूग्णालय सुरू करून मोफत आरोग्य सेवा देण्याचा मानस आहे. प्रारंभी स्वागत नगराध्यक्षा सुनिता खामकर यांनी केले. प्रस्ताविक प्रकाश पाटील-टाकवडेकर यांनी केले. सभेस चंगेजखान पठाण, राजेंद्र मालू, रावसाहेब भिलवडे, अमरसिंह पाटील, आदी उपस्थित होता. त्यांच्या मनातही घड्याळ राजकीय वारसदार म्हणून जाहीर करणारे केवळ पक्षाच्या धोरणाप्रमाणे निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यांच्या मनात घड्याळ आहे, कॉँग्रेसची मते ही राष्ट्रवादीलाच मिळतील असा टोला आ. सा. रे. पाटील यांचे नाव न घेता खा. सुप्रिया सुळे यांनी लगावला. त्यांच्या मनातही घड्याळ राजकीय वारसदार म्हणून जाहीर करणारे केवळ पक्षाच्या धोरणाप्रमाणे निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यांच्या मनात घड्याळ आहे, कॉँग्रेसची मते ही राष्ट्रवादीलाच मिळतील असा टोला आ. सा. रे. पाटील यांचे नाव न घेता खा. सुप्रिया सुळे यांनी लगावला.