मराठा समाजाला ओबीसी सवलत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:55+5:302021-07-04T04:17:55+5:30
जयसिंगपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वीच्या मराठा समाजातील नोकरीस पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या तत्काळ कराव्यात, मराठा समाजाला ओबीसीच्या सवलती मिळाव्यात यासह ...

मराठा समाजाला ओबीसी सवलत द्या
जयसिंगपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वीच्या मराठा समाजातील नोकरीस पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या तत्काळ कराव्यात, मराठा समाजाला ओबीसीच्या सवलती मिळाव्यात यासह अन्य प्रश्नांसाठी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे शनिवारी निवेदनाव्दारे करण्यात आली.
तीस वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संघर्ष सुरू आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची आवश्यकता आहे. या समाजातील एस.ई.बी.चे राज्य सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. सरकारने विशेष अधिवेशन बोलवून हा प्रश्न तत्काळ निकालात काढण्याची गरज आहे. शिवाय सर्व समाजघटकांची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात डॉ. विकास पाटील, अक्षय पाटील, बजरंग खामकर, नेताजी बुवा, आकाश खोत यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता.
फोटो - ०३०७२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना निवेदन देण्यात आले.