दहा लाख दे, अन्यथा पत्नीचे व्हिडिओ व्हायरल करेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:28 IST2021-09-09T04:28:38+5:302021-09-09T04:28:38+5:30
कोल्हापूर : पत्नीचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या पतीकडे दहा लाखाची खंडणी मागितल्याची तक्रार करवीर पोलीस ...

दहा लाख दे, अन्यथा पत्नीचे व्हिडिओ व्हायरल करेन
कोल्हापूर : पत्नीचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या पतीकडे दहा लाखाची खंडणी मागितल्याची तक्रार करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. याप्रकरणी देवदास बाळासाहेब घाटे (रा. जीवबा नाना पार्क) यांच्यावर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
येथील कळंबा रोडवर राहणाऱ्या एकाला देवदास घाटे याने बोलावून घेतले. त्याच्याकडे दहा लाखाच्या खंडणीची मागणी केली. त्यावेळी त्याने ते देण्यास स्पष्ट नकार दिला. त्याने, तुझ्या पत्नीसोबतचे फोटो व व्हिडिओ क्लीप माझ्याकडे आहेत, तू दहा लाख रुपये दिले नाहीस तर ते सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली. या प्रकारामुळे पीडिताने त्याबाबतची तक्रार करवीर पोलीस ठाण्यात दिली, त्यावरुन देवदास घाटे याच्यावर खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.