शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

काळम्मावाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्या, आमदार पी. एन. पाटील यांची मागणी

By विश्वास पाटील | Updated: July 24, 2023 19:51 IST

कौलव : काळम्मावाडी धरणाच्या भिंतीतील पाणी गळती काढण्याच्या नावाखाली गेल्या वर्षी 30 टक्के पाणीसाठा कमी केला होता. त्याचा कोल्हापूर ...

कौलव : काळम्मावाडी धरणाच्या भिंतीतील पाणी गळती काढण्याच्या नावाखाली गेल्या वर्षी 30 टक्के पाणीसाठा कमी केला होता. त्याचा कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला फटका बसला. भिंतीला गळती लागल्यामुळे धरण धोक्यात असून दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्यावा, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील-सडोलीकर यांनी आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबीची गांभीर्याने नोंद घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.काळम्मावाडी धरणाची पाणीसाठवण क्षमता २८ टी.एम.सी. असून या धरणाच्या मुख्य भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. धरणातून प्रतिसेकंद ६५० लिटर्स पाणी गळती होते. ही गळती एक वर्षात काढणार असून ८४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे व निविदा  काढणार आहे. असे सांगून काही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीस टक्के पाणीसाठा कमी केला होता. मात्र पावसाला उशिर झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यात तीव्र  पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले होते. मात्र गेल्या वर्षभरात या कामावर एक रुपयाही खर्च झालेला नाही.जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत पाणी टंचाई का निर्माण झाली असा प्रश्न उपस्थित केला असता या कामासाठी टेंडरच  मंजूर झाले नसून ८४  कोटींचे पुन्हा टेंडर काढणार असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र त्यासाठी पुन्हा या वर्षी 30 टक्के पाणीसाठा कमी केला जाणार आहे. त्यामुळे यंदा पुन्हा तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे धरण फुटल्यावरच काम होणार काय? असा संतप्त सवाल आ. पाटील यांनी उपस्थित केला. उपमुख्यमंत्री फडणवीस तातडीने कार्यवाहीचे दिले आश्वासनधोकादायक असलेल्या काळम्मावाडी धरणाची दुरुस्ती लवकर होणार काय? याबाबत शासनाने स्पष्टीकरण द्यावे व तातडीने निधी मंजूर करून निविदा काढावी अशी मागणीही पाटील यांनी केली. या मागणीवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणP. N. Patilपी. एन. पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Monsoon Sessionमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३