मार्च-एप्रिलमध्ये तुटणाऱ्या उसाला प्रतिटन तीनशे रुपये जादा दर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:25 IST2021-01-25T04:25:59+5:302021-01-25T04:25:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सावरवाडी : कोल्हापूर जिल्ह्यात यंदाच्या ऊस गळीत हंगामात सहकारी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम निम्म्यावर ...

मार्च-एप्रिलमध्ये तुटणाऱ्या उसाला प्रतिटन तीनशे रुपये जादा दर द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सावरवाडी : कोल्हापूर जिल्ह्यात यंदाच्या ऊस गळीत हंगामात सहकारी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम निम्म्यावर आला आहे. साखर कारखान्याच्या ऊसतोडणी पाळीपत्रकानुसार उसाची तोडणी होत नाही. ऊस गळीत हंगाम लांबल्यास मार्च महिन्यात तुटणाऱ्या उसाला प्रतिटनी तीनशे रुपये जादा दर साखर कारखान्यांनी द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस नामदेवराव पाटील (हसूरकर) यांनी केली.
साखर कारखान्याकडून ऊसतोडणी मजूर टंचाई हे कारण पुढे करून ऊस तोडण्या दिल्याने साखर कारखान्याच्या नोंदणीकृत ऊस तोडणी पाळीपत्रकावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाची उचल वेळेत नियोजित हंगामात होत नाही.
यंदाच्या ऊस गळीत हंगामात मार्च-एप्रिल महिन्यांत तुटणाऱ्या उसाला एफआरपीमध्ये जादा ३०० रुपये दर शेतकऱ्यांना देण्यात गरजेचे आहे. उसाची नियोजित हंगामात उचल न झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही पाटील यांनी केली.