तंबाखू उद्योगातील महिलांना बोनस द्या; ‘लाल बावटा’ची मागणी
By Admin | Updated: October 9, 2014 23:04 IST2014-10-09T22:11:19+5:302014-10-09T23:04:36+5:30
कामगार युनियनच्या वतीने मर्चंट असोसिएशनच्या अध्यक्षांकडे

तंबाखू उद्योगातील महिलांना बोनस द्या; ‘लाल बावटा’ची मागणी
जयसिंगपूर : तंबाखू उद्योगातील महिला कामगारांना दिवाळीकरिता २१ दिवसांची पगारी रजा तसेच सात राष्ट्रीय सणांच्या सुट्यांचा पगार व साडेबारा टक्केबोनस मिळावा, अशी मागणी लाल बावटा कामगार युनियनच्या वतीने मर्चंट असोसिएशनच्या अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली आहे. जयसिंगपूर शहरात तंबाखू उद्योगामध्ये काम करणाऱ्या महिला कामगारांची संख्या मोठी आहे. या कामगारांना आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही सवलती मिळत नाहीत. किमान वेतन कायद्याप्रमाणे महिला कामगारांना भविष्य निर्वाह निधी, बाळंतपणाची रजा, आठवड्याची सुटी यांसह अन्य सवलती मिळाव्यात. दिवाळीचा सण जवळ आल्याने कामगारांना २१ दिवसांची हक्काच्या पगारी रजेची रक्कम, सात राष्ट्रीय सणांच्या सुट्यांचा पगार व साडेबारा टक्केबोनस द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर लाल बावटा कामगार युनियनचे अध्यक्ष रघुनाथ देशिंगे, फुलाबाई बेडगे, शोभा जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष भरत शहा, तंबाखू कमिटीचे अध्यक्ष संजयकुमार बलदवा, दुकान गाळे निरीक्षक के. सी. कदम यांना निवेदन देण्यात आले.