कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:18 IST2021-06-03T04:18:48+5:302021-06-03T04:18:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनामुळे पालक गमावलेल्या १७५ बालकांपैकी दोन्ही पालक गमावलेली २ बालके आहेत. या बालकांना ...

Give the benefit of government scheme to the children orphaned by Corona | कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्या

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्या

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनामुळे पालक गमावलेल्या १७५ बालकांपैकी दोन्ही पालक गमावलेली २ बालके आहेत. या बालकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांचे सर्वेक्षण करून त्याचा पाठपुरावा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी केल्या.

कोरोनाच्या अनुषंगाने बालकांची काळजी व संरक्षणासाठी स्थापन केलेल्या कृती दल समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुजाता शिंदे, विधी सल्लागार आशिष पुंडपळ उपस्थित होते. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे व महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून यात सहभागी झाल्या.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, अजूनही गावनिहाय व महापालिका क्षेत्रातील अनाथ बालकांचा शोध घेऊन त्याची माहिती टास्क फोर्सकडे सादर करा. बालगृहातील कर्मचाऱ्यांचे तातडीने लसीकरण करून घ्या, बालगृह व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांच्या याद्या तात्काळ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना द्याव्यात.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित बालकांसाठी शहरी व ग्रामीण भागासाठी एकाच ठिकाणी कोविड केंद्राची व्यवस्था जिल्हा आरोग्य अधिकारी व महापालिका आरोग्य अधिकारी यांनी संयुक्तरित्या करावी. यासाठी आवश्यक कर्मचारी महापालिका आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नेमावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

00000

फोटो कोलडेस्क ला मेल टास्क फोर्स नावाने केला आहे

ओळ :

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बाल संरक्षण कृती दलाची बैठक झाली.

---

Web Title: Give the benefit of government scheme to the children orphaned by Corona