शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकच्या माध्यमातून विवाह करून तरुणीची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 11:11 IST

फेसबुकच्या माध्यमातून विवाह करून फसवणूक केल्याप्रकरणी पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील तरुणावर लक्ष्मीपुरी पोलिसांत बुधवारी (दि. २४) गुन्हा दाखल झाला. विपुल संजय झगडे (वय ३०, रा. लाटवडे रोड) असे या संशयित तरुणाचे नाव आहे. संबंधित तरुणीने याबाबत न्यायालयात फिर्याद दिली.

ठळक मुद्देफेसबुकच्या माध्यमातून विवाह करून तरुणीची फसवणूकपेठवडगावातील तरुणावर गुन्हा : न्यायालयात दिली फिर्याद

कोल्हापूर : फेसबुकच्या माध्यमातून विवाह करून फसवणूक केल्याप्रकरणी पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील तरुणावर लक्ष्मीपुरी पोलिसांत बुधवारी (दि. २४) गुन्हा दाखल झाला. विपुल संजय झगडे (वय ३०, रा. लाटवडे रोड) असे या संशयित तरुणाचे नाव आहे. संबंधित तरुणीने याबाबत न्यायालयात फिर्याद दिली.पोलिसांनी सांगितले की, मूळ पेठवडगाव व सध्या लक्ष्मीपुरी परिसरात राहत असलेल्या या तरुणीची विपुल झगडेबरोबर फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. त्यातून या दोघांनी २८ मार्च २०१६ ला कोल्हापूर येथील नोंदणी कार्यालयात विवाह कायद्यानुसार विवाह केला. संबंधित तरुणी ही शिक्षण घेत असल्याने ती पती विपुल झगडेबरोबर नांदावयास गेली नाही.

या तरुणीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने विपुलबाबत चौकशी केली असता, त्याने मिळकतीबाबत सांगितलेली सर्व माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे या तरुणीच्या लक्षात आले. त्यानंतर तिने नोंदणी कार्यालयात जाऊन विवाहाची कागदपत्रे मिळविली. त्यावेळी या तरुणीला आपला कायदेशीर विवाह झाल्याचे लक्षात आले.

या प्रकाराने तरुणीने विपुलची भेट घेऊन विवाह रद्द करण्याविषयी विनंती केली असता त्याने विवाह रद्द करायचा नाही, असे सांगून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच गावामध्ये बदनामी करून तरुणी व तिच्या घरच्यांविरुद्ध पोलिसांत खोट्या तक्रारी दिल्या. अखेर या त्रासास कंटाळून या तरुणीने न्यायालयात फिर्याद दिली. या प्रकरणी संशयित विपुल झगडेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. २८ मार्च २०१६ ते २०१८ च्या दरम्यान हा प्रकार घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीonlineऑनलाइनkolhapurकोल्हापूर