शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शाळेत जातो म्हणून बाहेर पडलेल्या मुलीने संपविले जीवन, कारण अस्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 19:50 IST

घटनेमुळे कोडुलकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला

इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथील एका १५ वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मीनाक्षी जनार्दन कोडुलकर (रा. चिंतामणी मंदिर जवळ, कोरोची) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. याबाबतची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे.मीनाक्षी शुक्रवारी सकाळी शाळेला जातो म्हणून घरातून निघाली होती. तिचे वडील जनार्दन कोडुलकर हे स्क्रॅप खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. ते पत्नी पूजा यांना सोबत घेऊन कामानिमित्त घराबाहेर गेले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास आई पूजा कोडुलकर या कामावरून जेवणासाठी घरी परतल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला.त्यांनी आत जाऊन पाहिले असता वरच्या मजल्यावरील खोलीत मीनाक्षीने छताच्या लोखंडी पाइपला साडी बांधून गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पती जनार्दन यांना फोन करून ही माहिती दिली.त्यांनी शहापूर पोलिसांना कळवले. पोलिसांनी पंचनामा केला. पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. परंतु मीनाक्षीने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी शहापूर अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे कोडुलकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मीनाक्षी हिच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे.