कणेरी फाटा उड्डाणपुलावरुन युवतीने टाकली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:47 IST2021-02-28T04:47:04+5:302021-02-28T04:47:04+5:30

पोलिसांकडून मिळालली माहिती अशी की, करवीर तालुक्यातील अल्पवयीन युवती महाविद्यालयात शिकत आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ती युवती आपल्या ...

The girl jumped from the Kaneri Fata flyover | कणेरी फाटा उड्डाणपुलावरुन युवतीने टाकली उडी

कणेरी फाटा उड्डाणपुलावरुन युवतीने टाकली उडी

पोलिसांकडून मिळालली माहिती अशी की, करवीर तालुक्यातील अल्पवयीन युवती महाविद्यालयात शिकत आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ती युवती आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत मार्गाकडून आली. कणेरी फाटा येथील उड्डाणपुलावर आल्यानंतर दोघेही थांबले होते. उड्डाणपुलावर वाहनांची कोंडी झाली होती. त्याचदरम्यान, युवतीने दुचाकीवरून उतरून उड्डाणपुलावरून थेट खाली राष्ट्रीय महामार्गावर उडी टाकली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला. सुदैवाने महामार्गावर त्यावेळी कोणतेही भरधाव वाहन जवळपास नव्हते, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. नागरिकांनी धावाधाव करून त्या युवतीला तातडीने महामार्गावरून बाजूला करून रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुमारे २५ फुटांवरून खाली पडल्याने तिला मुक्का मार लागला. त्याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.

दरम्यान, तिच्या सोबत आलेल्या मित्राने परिस्थिती पाहून घटनास्थळावरून धूम ठोकली. तो युवक कोण होता याचा गोकुळ शिरगाव पोलीस रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते.

Web Title: The girl jumped from the Kaneri Fata flyover