उत्तूर येथे तळ्यात बुडून बालिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:24 IST2020-12-29T04:24:13+5:302020-12-29T04:24:13+5:30

कपडे धुण्यासाठी गेलेल्या १० वर्षाच्या बालिकेचा तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पूजा राजू चव्हाण (वय १०, मूळगाव विजापूर (कर्नाटक), ...

Girl drowns in pond in North | उत्तूर येथे तळ्यात बुडून बालिकेचा मृत्यू

उत्तूर येथे तळ्यात बुडून बालिकेचा मृत्यू

कपडे धुण्यासाठी गेलेल्या १० वर्षाच्या बालिकेचा तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पूजा राजू चव्हाण (वय १०, मूळगाव विजापूर (कर्नाटक), सध्या रा. उत्तूर, ता. आजरा) असे तिचे नाव आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मूळचे कर्नाटकातील विजापूर येथील रहिवाशी असलेले राजू चव्हाण आणि त्यांचे चुलत भाऊ उत्तूरनजीक असलेल्या एका स्टोन क्रशरवर कामाला आहेत. रविवारी राजूची मुलगी पूजा ही चुलत बहिणींसोबत क्रशरनजीक असलेल्या तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पाय घसरून पूजा ही तलावात पडली.

पूजा पाण्यात बुडू लागल्याने अन्य मुलींनी आरडाओरड करत घरी जाऊन माहिती दिली. त्यामुळे तिच्या घरच्यांनी तलावाकडे धाव घेऊन तिला पाण्यातून बाहेर काढले. उपचारासाठी तातडीने तिला येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. परंतु, उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती. पूजाचे वडील राजू यांच्या वर्दीवरून पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: Girl drowns in pond in North