शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

उठाबशा काढल्यामुळे कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल झालेल्या चंदगडच्या त्या मुलीवर आता मुंबईमध्ये उपचार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 13:46 IST

५00 उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे तब्येत बिघडलेल्या कोल्हापूर जिल्हयातील भोतोली (ता. चंदगड) येथील शाळकरी मुलगी विजया निवृत्ती चौगुले हिला मुंबईमधील केईएम रुग्णालयात शुक्रवारी हलविण्यात आले. कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातून (सीपीआर) तिला दुपारी डिस्चार्ज देण्यात आला.

ठळक मुद्देकोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयामधून हलविले चंद्रकांतदादा पाटील वैद्यकिय खर्च करणारसीपीआरचे अधिष्ठाता रामानंद यांची माहिती

कोल्हापूर : ५00 उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे तब्येत बिघडलेल्या कोल्हापूर जिल्हयातील भोतोली (ता. चंदगड) येथील शाळकरी मुलगी विजया निवृत्ती चौगुले हिला मुंबईमधील केईएम रुग्णालयात शुक्रवारी हलविण्यात आले.कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातून (सीपीआर) तिला दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. या मुलीचा सर्व वैद्यकिय खर्च महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील करणार असल्याची माहिती राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले. त्यामुळे या मुलीवरील सर्व वैद्यकिय चाचण्या आता मुंबईत होणार आहेत.सीपीआर रुग्णालयामध्ये सोमवारी (दि. ११) सायंकाळी उपचारासाठी या मुलीला आणण्यात आले. याठिकाणी तिचे सी.टी.स्कॅन, एमआरआय आणि सर्व शारिरीक तपासण्या करण्यात आल्या. पण, काही निदान झाले नाही. त्यामुळे न्युरो फिजिथेरपीस्ट डॉ. औरंगाबादकर यांनीही तपासणी केली. पण, कोणताही दोष आढळून आला नाही. त्यामुळे पुढील उपचाराकरिता मुंबईला हलविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

शुक्रवारी सकाळी कागदपत्रांची सर्व प्रक्रिया पूर्ण करुन दूपारी तिला रुग्णवाहिकेमधून मुंबईला नेण्यात आले. विजया चौगुले यांच्यासमवेत तिची आजी पार्वती चौगुले, वडिल निवृत्ती चौगुले व नातेवाईक गेले आहेत.

यावेळी वैद्यकिय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, जि.प. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किरण लोहार, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, अमोल पालोजी, हेमंत आराध्ये, भाजपा युवा मोर्चाचे शिवाजी पेठ मंडलचे अध्यक्ष ऋतुराज इंगळे आदी उपस्थित होते.(छाया : दीपक जाधव )भोतोलीतील या मुलीला गृहपाठाच्या वही घरी विसरली म्हणून संशयित शिक्षिका अश्विनी देवण यांनी ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा २४ नोव्हेंबरला कानूर येथे शाळेत दिली. विजयाने कशातरी ३०० उठाबशा काढल्या. पण, त्यानंतर तिची प्रकृति बिघडली. प्रथम तिच्यावर गडहिंग्लज येथे खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला सीपीआर रुग्णालयाकडे उपचारासाठी आणण्यात आले होते.

विजया चौगुले या मुलीचे निदान स्पष्ट झाले नाही. त्यामुळे तिच्यावर ‘व्हीडीओ-ईईजी’नुसार अत्याधुनिक पद्धतीने वैद्यकिय चाचण्या केईएम रुग्णालयामध्ये होणार आहे. याबाबत अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्याशी बोलणे झाले आहे.-डॉ. जयप्रकाश रामानंद,प्रभारी अधिष्ठाता, राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, कोल्हापूर.

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर