शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शासनाच्या धोरणात्मक निर्णयाविरोधात बोलणे पडले महागात, शिक्षक गिरीष फोंडे तडकाफडकी निलंबित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 11:47 IST

कोल्हापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील सहायक शिक्षक गिरीष आनंदा फोंडे यांना शुक्रवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात ...

कोल्हापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील सहायक शिक्षक गिरीष आनंदा फोंडे यांना शुक्रवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनाच्या अनुषंगाने शासनाच्या धोरणात्मक निर्णयांविरुद्ध बोलणे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यास विरोध करण्याची भूमिका त्यांच्या अंगलट आली.फोंडे हे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील लोणार वसाहत विद्यामंदिर या शाळेत सहायक शिक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांच्यावर शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास करण्याच्या दृष्टीने दर्जेदार शिक्षण देण्याचे कामकाज पूर्ण क्षमतेने करण्याची जबाबदारी देण्यात आली होती तरीही मूळ कामाकडे दुर्लक्ष करून त्यांनी शक्तिपीठ आंदोलनात सहभाग घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधात प्रक्षोभक वक्तव्य करून त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ कलम ५ (१) मधील तरतुदीचा भंग झाल्याने त्यांच्यावर उपायुक्त पंडित पाटील यांनी ही कारवाई केली.यापूर्वी फोंडे यांनी शिक्षणसेवक या पदावर असताना प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती यांच्याविरुद्ध अवमानकारक निवेदन दिले होते. महापौरांना दुरुत्तरे देऊन त्यांचाही अवमान केला होता तेव्हा दि.१३.०९.२००४ चे आदेशाने त्यांची सेवा समाप्ती करण्यात आली होती. त्यानंतर अध्यक्ष, ग्रीव्हेन्स कमिटी, मुंबई यांचे आदेशानुसार दि.१७.०२.२००५ रोजी त्यांना पुनश्च: सेवेत हजर करून घेण्यात आले.

त्यानंतर वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमोक्रेटीक युथ यांच्या उपाध्यक्षपदी राहून जगभर संपर्क प्रस्थापित करण्यासाठी दि.१६.०८.२०१२ ते १५.१०.२०१४ अखेर विनापरवानगी गैरहजर राहिले होते. त्यावेळी त्यांच्या दोन वेतनवाढी कायमस्वरुपी रोखण्याची कारवाई करण्यात आली होती. वारंवार सूचना देऊनही फोंडे यांच्यात कोणत्याही प्रकारचे गांभीर्य घेतल्याचे दिसून येत नसल्याचे निलंबन आदेशात नमूद केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकारTeacherशिक्षक