परंपरेला फाटा देत उत्तरकार्याला औषधी वनस्पतींची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:23 IST2021-03-26T04:23:21+5:302021-03-26T04:23:21+5:30
गारगोटी, मुदाळ (ता.भुदरगड) येथे उत्तरकार्याच्या अनाठायी खर्चाला फाटा देऊन पर्यावरण रक्षणार्थ व आयुर्वेदिक औषधांचा प्रचार व प्रसार व्हावा या ...

परंपरेला फाटा देत उत्तरकार्याला औषधी वनस्पतींची भेट
गारगोटी,
मुदाळ (ता.भुदरगड) येथे उत्तरकार्याच्या अनाठायी खर्चाला फाटा देऊन पर्यावरण रक्षणार्थ व आयुर्वेदिक औषधांचा प्रचार व प्रसार व्हावा या उदात्त उद्देशाने विविध वृक्षांची व औषधी वनस्पतींच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
येथील कांचन धनाजी पाटील यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ उत्तरकार्यादिवशी विविध वृक्ष व औषधी गुणधर्म असलेल्या रोपांचे वाटप करण्यात आले.
बिद्री येथील शांती हॉस्पिटलचे डॉ.तानाजी हरेल यांनी उपक्रमाचे आयोजन केले होते.या वेळी डॉ.हरेल व विविध मान्यवरांच्या हस्ते ३०० विविध औषधी रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी धनाजी पाटील, प्रशांत साठे, श्याम पाटील, भिकाजी पाटील, सुरेश पटेल, विजय वाईंगडे, प्रदीप वरुटे, संग्राम हळदकर, पी.एच.पाटील, बाळासाहेब पोवार, रमेश पाटील, अरुण पाटील, डॉ.तानाजी हरेल, सुभाष पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळ
उत्तरकार्याच्या कार्यक्रमात वनौषधीं वृक्षरोपांचे वाटप करताना डॉ हरेल, धनाजी पाटील, प्रशांत साठे, श्याम पाटील आदी