घोसरवाड जानकी वृद्धाश्रमास जीवनावश्यक वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:29 IST2021-09-17T04:29:01+5:302021-09-17T04:29:01+5:30
कोरोनामुळे सर्वच क्षेत्रावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे केवळ दातृत्वावर सुरू असलेले येथील जानकी वृद्धाश्रमाला अन्नधान्यासह, आर्थिक चणचण भासत ...

घोसरवाड जानकी वृद्धाश्रमास जीवनावश्यक वस्तू
कोरोनामुळे सर्वच क्षेत्रावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे केवळ दातृत्वावर सुरू असलेले येथील जानकी वृद्धाश्रमाला अन्नधान्यासह, आर्थिक चणचण भासत आहे. वृद्धाश्रमात ४० हून अधिक वृद्ध असल्याने त्यांच्या आहाराबरोबर औषधोपचारांचा खर्च चालविण्यासाठी वृद्धाश्रम चालक बाबासाहेब पुजारी यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
वृद्धाश्रमातील परिस्थिती ओळखून लायन्स क्लबचे प्रांतपाल सुतार व ॲड. जमदग्नी यांनी जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात मदत केली. शिवाय वृद्धांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत मायेचा आधार दिला. त्यामुळे वृद्धांतून समाधान व्यक्त होत आहे.
फोटो - १६०९२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमात लायन्सचे प्रांतपाल सुनील सुतार व ॲड. विजय जमदग्नी यांनी जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. यावेळी चालक बाबासाहेब पुजारी यांच्यासह वृद्ध उपस्थित होते.