वारणा दूध संघामार्फत गणेश चतुर्थीला सभासदांना तूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:30 IST2021-09-04T04:30:02+5:302021-09-04T04:30:02+5:30

प्रतिवर्षीप्रमाणे तूप देण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष, आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. रविवार, दि. ५ ते सोमवार, ...

Ghee to Ganesh Chaturthi members through Warna Dudh Sangh | वारणा दूध संघामार्फत गणेश चतुर्थीला सभासदांना तूप

वारणा दूध संघामार्फत गणेश चतुर्थीला सभासदांना तूप

प्रतिवर्षीप्रमाणे तूप देण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष, आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. रविवार, दि. ५ ते सोमवार, दि. २० सप्टेंबर या कालावधीत संघाच्या संबंधित प्राथमिक दूध संस्था, वितरण केंद्रे व वितरक यांच्यामार्फत सभासदांना तूप वाटप होणार आहे.

कोल्हापूर व परिसरातील अ वर्ग व क वर्ग सभासदांचे तुपाचे स्टेशन रोड, कोल्हापूर विक्री केंद्रातून ५ सप्टेंबरपासून वाटप सुरू होईल. दूध संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध संस्थांकडे सभासदांना दि. १० ते २० सप्टेंबर या कालावधीत तूप वितरण करण्यात येणार आहे.

कोविड१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून सभासदांच्या सोयीच्या दृष्टीने कोल्हापूर येथील अ वर्ग व क वर्ग सभासदांसाठी सभासद यादी क्रमांकानुसार वाटप होईल. सभासदांनी ओळखपत्र अन्य कागदपत्रांची झेराक्स दाखवून मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करून सवलतीच्या दरातील तूप घेऊन जावे, असे आवाहन संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केले.

यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, अकौंटस् मॅनेजर सुधीर कामेरीकर, फॅक्टरी मॅनेजर श्रीधर बुधाळे, मार्केटिंगचे अनिल हेर्ले, आर. व्ही. देसाई,

संकलन विभागाचे अर्चना करोशी, अशोक पाटील आस्थापनचे सचिन माने आदी उपस्थित होते.

फोटो- विनय कोरे

Web Title: Ghee to Ganesh Chaturthi members through Warna Dudh Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.