सर्वसामान्यांना शिक्षण देण्यासाठी घाटगे कुटुंब तत्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST2021-03-30T04:14:12+5:302021-03-30T04:14:12+5:30

शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित अमृतमहोत्सवी मुरगूड विद्यालय ज्युनिअर कॉलेज येथे दि कागल सिनिअर चॅरिटेबल ट्रस्टच्या शिष्यवृत्ती वितरण समारंभात ...

Ghatge family eager to educate the common man | सर्वसामान्यांना शिक्षण देण्यासाठी घाटगे कुटुंब तत्पर

सर्वसामान्यांना शिक्षण देण्यासाठी घाटगे कुटुंब तत्पर

शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित अमृतमहोत्सवी मुरगूड विद्यालय ज्युनिअर कॉलेज येथे दि कागल सिनिअर चॅरिटेबल ट्रस्टच्या शिष्यवृत्ती वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एस.आर. पाटील होते. जयसिंगराव घाटगे व विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रतिमांचे पूजन दत्तात्रय खराडे, शिंदेवाडीच्या सरपंच रेखा माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या ४५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच रेखा माळी, दत्तात्रय खराडे, अनंत फर्नांडिस यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावीच्या परीक्षेत केंद्रात प्रथम येणारे स्नेहल मगदूम, सुचित्रा हळदकर, आदित्य लोकरे यांचा गुणगौरव करण्यात आला. प्राचार्य एस.आर. पाटील यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा व स्थापनेपासून विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीत ट्रस्ट व घाटगे कुटुंबीय यांच्या योगदानाची माहिती दिली. प्रास्ताविक उपप्राचार्य एस.पी. पाटील, सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले. आभार पर्यवेक्षिका एस.वाय. बेलेकर यांनी मानले.

फोटो ओळ

मुरगुड, ता.कागल येथील मुरगुड विद्यालयामध्ये दि कागल सीनिअर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरित करताना दत्तात्रय खराडे, सरपंच रेखा माळी, प्राचार्य एस.आर.पाटील, उपप्राचार्य एस.पी.पाटील, एस.वाय.बेलेकर आदी.

Web Title: Ghatge family eager to educate the common man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.