‘जागृती’ने सुसंस्कारित पिढ्या घडविल्या
By Admin | Updated: April 4, 2015 00:14 IST2015-04-03T21:13:49+5:302015-04-04T00:14:45+5:30
रत्नमाला घाळी : गडहिंग्लज येथे रंगमंचाचे उद्घाटन थाटात

‘जागृती’ने सुसंस्कारित पिढ्या घडविल्या
गडहिंग्लज : माजी विद्यार्थ्यांनी जिद्दीने शाळेला रंगमंच व व्यायामशाळा बांधून दिली. त्यामुळे जागृती प्रशालेने केवळ ज्ञानच दिले नाही, तर सुसंस्कारित विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडविल्याची प्रचिती आली, असे गौरवोद्गार विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी यांनी काढले.शहरातील विद्या प्रसारक मंडळ व जागृती प्रशालेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांच्या देणगीतून साकारलेल्या रंगमंच उद्घाटन सोहळ्यात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी ‘जागृती सुवर्णस्मृती’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सुरगीश्वर मठाचे मठाधिपती चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांची उपस्थिती होती.घाळी म्हणाल्या, कित्तूरकरअण्णा व आलूरकर सरांच्या मार्गदर्शनामुळेच संस्थाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळू शकले. प्रा. दत्ता पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. पीएसआय परीक्षा उत्तीर्ण माजी विद्यार्थी जयश्री नावलगी हिचा सत्कार झाला. यावेळी उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, संचालक किशोर हंजी, महेश घाळी, गजेंद्र बंदी, रवींद्र हत्तरकी, नागेश पट्टणशेट्टी, तुकाराम रावळ, सुरेश संकेश्वरी, आप्पासाहेब कोड्ड, आदी उपस्थित होते. राजेश पाटील यांनी स्वागत, सतीश घाळी यांनी प्रास्ताविक, तर सुभाष कोरे यांनी सूत्रसंचालन केले.
वेल्हाळ यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन
माजी विद्यार्थी, छायाचित्रकार अनिल वेल्हाळ यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. प्रकाश आजरी यांच्या हस्ते, तर नीला हंजी यांच्या पेंटिंग्ज प्रदर्शनाचे उद्घाटन शैला मंत्री यांच्या हस्ते झाले.
उदय जोशी व मीना कोल्हापुरे यांचे कौतुक
प्रशालेस ३५ लाखांचा भव्य रंगमंच व व्यायामशाळा बांधून दिल्याबद्दल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष उदय जोशी व मीना कोल्हापुरे यांचे संस्थाध्यक्षा रत्नमाला घाळी यांनी विशेष कौतुक करून कृतज्ञ माजी विद्यार्थ्यांचे ऋण व्यक्त केले.