सर्वसामान्यांनीही जोडले रक्ताचं नातं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST2021-07-05T04:15:41+5:302021-07-05T04:15:41+5:30
‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. यंदा कोरोना संसर्गाच्या वाढता प्रादुर्भावामुळे राज्यात ...

सर्वसामान्यांनीही जोडले रक्ताचं नातं
‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. यंदा कोरोना संसर्गाच्या वाढता प्रादुर्भावामुळे राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब जाणून लोकमतने हा उपक्रम सर्वत्र मोठ्या प्रमाणात राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोल्हापुरातही या महारक्तदान शिबिराची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कोल्हापूरकरांनीही त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यात मंगळवार पेठेतील मंथन फाउंडेशन आणि रौनक शहा फाउंडेशन व संघवी मीनाबाई पोपटलालजी शहा हाॅस्पिटलमधील डाॅक्टर व कर्मचारी अधिकाऱ्यांनीही रक्तदान करून आपलीही सामाजिक जबाबदारी पार पाडली. सकाळी ९ ते दुपारी दोन या कालावधीत २६ रक्त पिशव्यांचे संकलन येथून झाले. या शिबिरास अर्पण ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. या शिबाराचे उद्घाटनप्रसंगी पीएमएस हाॅस्पिटल ग्रुप्सचे संस्थापक रौनक शहा व डाॅ. रवींद्र वराळे, डाॅ.पी.व्ही. गाडवे, डाॅ. विवेक भोईटे आदी उपस्थित होते.
फोटो : ०४०७२०२१-कोल-संघवी मीनाबाई शहा हाॅस्पिटल
आेळी : लोकमततर्फे स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मंगळवार पेठेतील संघवी मीनाबाई पोपटलालजी शहा हाॅस्पिटल आणि डायग्नोसिस सेटरमध्ये महारक्तदान शिबिर करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे संस्थापक रौनक शहा व डाॅ. रवींद्र वराळे, डाॅ.पी.व्ही. गाडवे, डाॅ. विवेक भोईटे आदी उपस्थित होते.