ग्रामपंचायत मतमोजणीदिवशी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:34 IST2020-12-30T04:34:07+5:302020-12-30T04:34:07+5:30

कोल्हापूर : ग्रामपंचायतीच्या मतमोजणीदिवशी १८ जानेवारीला जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ठेवण्यात आली आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांची ही ...

General meeting of Zilla Parishad on Gram Panchayat counting day | ग्रामपंचायत मतमोजणीदिवशी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा

ग्रामपंचायत मतमोजणीदिवशी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा

कोल्हापूर : ग्रामपंचायतीच्या मतमोजणीदिवशी १८ जानेवारीला जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ठेवण्यात आली आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांची ही शेवटची सभा असण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज, बुधवारी दुपारी एक वाजता समिती सभागृहात स्थायी समितीची सभा होणार आहे.

कोरोनाच्या काळामध्ये बहुतांशी सभा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. मात्र, आता स्थायी आणि सर्वसाधारण सभा ही प्रत्यक्ष घेतली जाणार आहे. १८ जानेवारीला दुपारी एक वाजता राजर्षी शाहू सभागृहामध्ये ही सभा होईल.

आज सकाळी ११ वाजता जलव्यवस्थान समितीची सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता स्थायी सभा होईल. यावेळी रोजगार हमी योजनेचा सुधारित आराखडा, वार्षिक आराखडा, लेबर बजेट मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या मतमोजणीदिवशी सर्वसाधारण सभा ठेवल्याने काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असताना ही सभा ठेवल्याने ही नाराजी आहे.

Web Title: General meeting of Zilla Parishad on Gram Panchayat counting day