शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 6:06 PM

कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. १८) होत असून, पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या शहरातील सात नाल्यांशेजारील आवश्यक ती जागा संपर्क मार्गाकरिता आरक्षित करण्याचे प्रस्ताव तसेच अंबाबाई मंदिराच्या परिसरातील वाहनतळाच्या जागेत दर्शनमंडप असा फेरबदल करण्याचा प्रस्तावही नगररचना विभागाने मंजुरीकरिता या सभेसमोर ठेवला आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारीअंबाबाई मंदिराच्या परिसरातील वाहनतळाच्या जागेत दर्शनमंडप

कोल्हापूर : महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. १८) होत असून, पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या शहरातील सात नाल्यांशेजारील आवश्यक ती जागा संपर्क मार्गाकरिता आरक्षित करण्याचे प्रस्ताव तसेच अंबाबाई मंदिराच्या परिसरातील वाहनतळाच्या जागेत दर्शनमंडप असा फेरबदल करण्याचा प्रस्तावही नगररचना विभागाने मंजुरीकरिता या सभेसमोर ठेवला आहे.पंचगंगा नदी प्रदूषण करणारे नाले अडवून त्यांवर बंधारे, स्क्रीन चेंबर, वेटवेल बांधणे, इत्यादींकरिता आवश्यक संपर्कमार्गाकरिता जागा आरक्षित करावी लागणार आहे. तसेच झोनही बदलावे लागणार आहेत. लक्षतीर्थ, जुना बुधवार, वीटभट्टी, सीपीआर, रमणमळा, राजहंस, ड्रीमवर्ल्ड येथील नाल्यांचा त्यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७ अन्वये फेरबदल करण्याचे प्रस्ताव नगररचना विभागाने दिले आहेत. त्यावर या सभेत निर्णय होणार आहे.अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा मंजूर झालेला आहे. या आरखड्यात दर्शन मंडप हा एक प्रमुख भाग आहे; परंतु त्या ठिकाणी दर्शन मंडपाकरिता आरक्षित जागा नाही. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या वाहनतळासाठी आरक्षित असलेल्या जागेवर दर्शन मंडप असा फेरफार करण्याचा प्रस्तावही सभेत चर्चेला येणार आहे.शहर हद्दीतील २०० चौरस मीटरच्या आतील बांधकाम परवानगी पूर्ववत विभागीय कार्यालयाकडे देण्याचा सदस्य ठराव विषयपत्रिकेवर आहे.कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प उभारणे, महावीर उद्यानात भगवान महावीर यांचा पुतळा उभारण्यास जागा द्यावी, लक्ष्मीपुरीतील दलाल मार्केटमधील आठ गाळे कोल्हापूर जिल्हा हज कमिटीला संपर्क कार्यालयास भाडेतत्त्वावर द्यावेत, काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाच्या सद्य:स्थितीची श्वेतपत्रिका काढावी, कोळेकर तिकटी, सणगर गल्ली तालीम ते पद्माराजे गर्ल्स हायस्कूल या रस्त्यास ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक यशवंत भालकर यांचे नाव देण्यात यावे, असे सदस्य ठरावही सभेसमोर चर्चेला येणार आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर