शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थेला जाब विचारणार, मतदान कार्ड नाही विकणार; कोल्हापुरातील सजग नागरिकांचा निर्धार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 11:59 IST

कोल्हापूर : प्रामाणिकपणे मतदान करून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी पक्ष बदलून आमच्या मताचा अनादर करत आहेत. ज्यासाठी त्यांना मत दिले ...

कोल्हापूर : प्रामाणिकपणे मतदान करून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी पक्ष बदलून आमच्या मताचा अनादर करत आहेत. ज्यासाठी त्यांना मत दिले त्या अपेक्षा ते विसरत आहेत. त्यामुळे येथून पुढे मताचा अधिकार वापरताना विचार तर करूच, पण जे अपेक्षाभंग करतील त्यांना याचा जाब विचारू. त्यांच्यासाठी आम्ही मतदान कार्ड विकणार नाही, असा निर्धार कोल्हापूर शहरातील सजग नागरिकांनी व्यक्त केला. देशासह राज्याच्या राजकारणात अनेक लोकप्रतिनिधी सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जात असल्याने आमच्या मताचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे. काहींनी याविरोधात ‘ मतदान कार्ड विकणे आहे’ अशा पोस्ट सोशल मीडियावर केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सिटीझन्स सिंडीकेट संघटनेच्या वतीने 'मतदान कार्ड विकणार नाही' या विषयावर शाहू स्मारक भवनात बुधवारी महाचर्चा आयोजित केली होती. या चर्चेत अनेक नागरिकांनी सहभाग घेतला.अनंत मांडुकलीकर म्हणाले, सध्याची राजकीय परिस्थिती पाहून लोकशाहीने आपल्याला काय दिले, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. पण, मतदानाचे मूल्य खरे शस्त्र आहे. प्रत्येकाने ते आता विचार करून वापरणे गरजेचे आहे.डॉ. मानसिंग जगताप म्हणाले, मताचा अधिकार वापरून समस्येला वाचा फोडा. संपतराव चव्हाण-पाटील म्हणाले, पक्ष, नेता नव्हे, उमेदवार पाहूनच मतदान करा.जीवन बोडके म्हणाले, सध्याच्या परिस्थितीवर नागरिकांनी बोलायला हवे. आपले अधिकार योग्य ठिकाणी वापरायला हवेत. सारिका बकरे म्हणाल्या, आरक्षित जागा आहे म्हणून किंवा घरातील कुणीतरी सांगते म्हणून महिला निवडणूक लढवतात; पण त्यांचा हा निर्णय मताचा अनादर करतो.यावेळी माजी नगरसेविका भारती पोवार, प्रा. टी. के. सरगर, सुमलेश कांबळे, दिग्विजय गवळी, डॉ. रोहन चौधरी उपस्थित होते. अक्षय जहागीरदार यांनी सूत्रसंचालन केले. सोनाली देशमुख यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVotingमतदान